
कर्मयोगी बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांच्या प्रतिमेचे पूजन करताना रामनाथ पानगव्हाणे, रामभाऊ पाटील, प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव आदी मान्यवर
काकासाहेब नगर (प्रतिनिधी ) के. के. वाघ शिक्षण संस्था संचलित, के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक महाविद्यालय काकासाहेबनगर महाविद्यालयात कर्मयोगी कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण ठोके यांनी आपल्या भाषणातून कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना त्यांच्या शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा ध्यास या गुणांसंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एल. जाधव होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून भाऊंच्या त्यागी वृत्तीचे आणि त्यांनी केलेल्या समाजकार्याचे यथोचित वर्णन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनीता शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. अतुल गवारे, महाविद्यालय विकास समिती सदस्य रामनाथ पानगव्हाणे, रामभाऊ पाटील, वैभव कुशारे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. प्रा. मिलिंद पवार, डॉ. भावना पौळ, डॉ. त्र्यंबक बाबळे, प्रा. शीतल जगताप, प्रा. मुक्ता मोरे, डॉ. प्रतिभा बाहेकर, प्रा. निलेश आहेर, प्रा. बाळकृष्ण फडे, प्रा. अर्चना ताकाटे, प्रा. भारती कुशारे, प्रा. काजल वाघ, प्रा. प्रतिक पाटील, प्रा. संकेत जाधव, प्रा. पल्लवी कदम, श्री. अनिल राजोळे, श्री. ज्ञानेश्वर गवळी, आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
