
ओझर: (प्रतिनिधी) ओझर येथील लोहियानगर येथे मिशन ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत अरुणोदय सिकलसेल अभियान राबविण्यात आले. ओझर नगर परिषदेचे नगरसेवक खंडेराव देवजी जोगारे यांच्या हस्ते अरुणोदय सिकल सेल मोहिमेचे उद्घाटन करून भागातील 66 मुले, गरोदर माता, सिकलसेल तपासणी करून तसेच हिमोग्लोबिन तपासणी शिबिर व आरोग्य शिक्षण देण्यात आले.
या शिबिराचे आयोजन हायस्कूलचे मुख्याधापिका श्रीमती प्रियंका खुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच आरोग्य सहायीका सोनाली सोनवणे, आरोग्य सेविका नंदा देवरे, आरोग्य सेविका प्रियांका दवणे आरोग्य सेवक विजय गायकवाड, आरोग्य सेवक समीर मुरुडेश्वर,आशाताई तनया जाधव गायत्री उगले संगीता भालेराव अंगणवाडी सेविका संगीता कढरे नम्रता उरकुडे यांनी सहभाग घेऊन 66 लाभार्थीची सिकलसेल व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. तपासणीबरोबरच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना समुपदेशन करून त्यांना सिकलसेल आजार व ॲनिमिया आजाराविषयी सविस्तर आरोग्य शिक्षण देण्यात आले.
सिकलसेल आजार हा आनुवंशिक रक्तविकार असून यामध्ये लाल रक्तपेशींचा आकार बदलून त्या विळयाच्या आकाराच्या होतात. त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन अशक्तपणा, वेदना, वारंवार आजारपण, संसर्गाचा धोका तसेच ॲनिमिया निर्माण होतो. वेळेवर तपासणी, योग्य समुपदेशन व आरोग्यविषयक मार्गदर्शन केल्यास या आजाराचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होते.हे शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर अंतर्गत उपकेंद्र दिक्षी मधील दात्याने यांच्या वतीने यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी डॉ.आनंद सुर्वे वैद्यकीय अधिकारी, प्राची पवार वैद्यकीय अधिकारी, मंजिरी सराफ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉ प्रतिभा जुनागडे आरोग्य सहाय्यक श्री राठी नाना, श्री देवरे नाना, प्रयोगशाळा अधिकारी श्रीमती पल्लवी कुलकर्णी, आरोग्य सहायिका छाया जाधव, आरोग्य सेवक अविनाश घोडविदे आरोग्य सेवक विजय गायकवाड, श्रीमती वंदना केरुळकर, श्रीमती सुनंदा चौधरी, आशा ताई अनिता मोटमल, पूनम गांगुर्डे, शैला ससाणे, सुनीता टोंगारे, रत्ना खरे, शारदा काटे, शुभांगी घरे, एच ए एल चे फेबॉस्टिक प्रशिक्षक बागुल यांच्या सहकार्याने सिकल सेल तपासणी व्यवस्थित पार पाडली युवक-युवतींमध्ये सिकलसेल व ॲनिमिया आजाराबाबत जागृती निर्माण करणे, लवकर निदान करणे आणि निरोगी पिढी घडविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
