
नाशिक ( प्रतिनिधी)शिक्षक-शिक्षकेतर सेनेची बेमुदत धरणे आंदोलनाची शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस .. कार्यालयामध्ये कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहत नसल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार.
प्रलंबित कामांचा साचलेले फायलींचे ढीग कधी कमी होणार….
शिक्षक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करूनही विविध कारणे देत प्रलंबित ठेवण्याचे काम माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून होत असून ते दहा दिवसाच्या आत मार्गी न लागल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा विभागीय शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेना , ईस्तू संघटना ,शिक्षक -शिक्षकेतर, संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांना आज आंदोलनाची नोटीस देण्यात आली. शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कार्यालयीन प्रमुख श्री.बोठे यांनी निवेदन स्वीकारले.
अनेक महिन्यांपासून शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कामे प्रलंबित असल्यामुळे शिक्षकांनी २१ जानेवारी रोजी शिक्षक आमदार किशोरजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दरबाराच्या माध्यमातून आंदोलन केले होते,मात्र त्यानंतरही शिक्षणाधिकारी माध्यमिक (नाशिक )यांनी कोणत्याही प्रकारची कामांची पूर्तता केली नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे .
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची शिक्षक ,मुख्याध्यापक, शिक्षकेतरांच्या नियमित मान्यता ,अनुकंपा तत्त्वावरील शिक्षक शिक्षकेतर मान्यता , एकस्तर प्रस्ताव मंजुरी व प्रलंबित फरक देयके , प्रलंबित शाळांचे वेतन , सह्यांच्या अधिकारांचे प्रस्ताव , डीएड ते बी.एड. मान्यता , न्यायालय निकालांची अंमलबजावणी , दोन महिन्यांपासून सर्व शाळांचे अनियमित होत असलेले वेतन आणि सेवानिवृत्ती प्रस्ताव याबाबत संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या संघटनेने वेळोवेळी आपणाकडे निवेदन देऊनही दाखल प्रस्ताव , मंजुरी दिलेले प्रस्ताव ,प्रलंबित प्रस्ताव , तुटी लावून पाठवलेले प्रस्ताव याची माहिती उलट टपाली मिळावी अशा प्रकारची मागणी निवेदनात करण्यात आली असून सदर कामांची सविस्तर यादीच शिक्षक सेनेने सोबत जोडली असून दहा दिवसात सदरचे प्रश्न मार्गी न आपल्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा शिक्षक सेनेचे राज्य विभागीय अध्यक्ष व संजय चव्हाण व ईस्तू संघटनेचे सरचिटणीस दिनेश अहिरे यांनी दिला
माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात पेन्शनचे काम पाहणारे संबंधित कारकून व इतर उपशिक्षणाधिकारी उपस्थित नसल्यामुळे या गोष्टीचा निषेध करण्यात आला.
शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित न राहता वेगवेगळ्या कारणांखाली बाहेर असल्याने शिक्षक – शिक्षकेतर यांची प्रलंबित कामे कधी पूर्ण होणार याबद्दल कुणीही जबाबदारी घेत नसून केवळ वेळकाढूपणा करीत असल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संताप व्यक्त केला. याबाबत विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांना अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडण्याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन दिले जाणार आहे.शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी लक्ष घालून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना प्रलंबित कामाबद्दल समज देऊन वेळेत पूर्ण होतील यासाठी कालबद्ध मुदत द्यावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक -शिक्षकेतर सेनेच्या वतीने जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक कामे प्रलंबित असून शिक्षणाधिकारी माध्यमिक व कर्मचारी हे कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित नसल्याने शिक्षक शिक्षकेतरांची कामे प्रलंबित राहत आहेत. याबाबतचे निवेदन नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार साहेब पाटील यांना देण्यात आले. त्यांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन महेश पाटील साहेब यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण इस्तु संघटनेचे सरचिटणीस दिनेश अहिरे , रोहित गांगुर्डे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर वाघ ,सुरेश घरटे विनोद हिरे, कलीम अन्सारी , राजेंद्र सोमवंशी,अनिल देवरे ,योगेश मोजाड ,राजेंद्र जगताप ,प्रशांत सूर्यवंशी , पोपट कांडेकर ,
प्रवीण पाळदे ,श्रीमती रुक्मिणी जाधव, श्रीमती स्वाती शिंदे ,श्रीमती सुनिता भांगरे , श्रीमती ज्योती साळुंखे श्रीमती सविता जाधव ,श्रीमती एस.यु. कापडणीस , विकास सोनवणे , छोटेराम सूर्यवंशी, शिवाजी चव्हाण,आर.एम.जगताप एस पी.ठोंबरे, सूर्यवंशी गोळेसर ,बोरसे आदी उपस्थित होते.
