
नाशिक (प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाच्या (NDMVP) संस्थेच्या गंगापूर रोड नाशिक येथील CMCS(कॉमर्स, मॅनेजमेंट अँड कॉम्पुटर सायन्स )
महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहता आले, हा सोहळा अंतर्नाद या नावाने दरवर्षी होत असतो यात सांस्कृतिक तसेच क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाते. त्या निमित्ताने माझा कवितेचा शब्दसूर हा काव्यगायनाचा कार्यक्रम झाला, गच्च भरलेल्या सभागृहामध्ये प्रत्येक कवितेला भरभरून दाद मिळाली, प्रचंड टाळ्यांनी विद्यार्थ्यांनी कवितेचे स्वागत केले, सुमारे तासभर शब्दांची जादु सभागृहात गुंजन करीत राहिली, cmsc कॉलेज फुलांचं झाड, कुणी असावं, माझ्या जीवाचा जीव साथ राहू दे, प्रियतमा, एक कहाणी,आई सोडून नको जाऊ, काही गजल आणि शेर सादर केले, “असे लिहावे,”, “घायाळ,” “श्वास माझा” या गजलानी तरुणाई ला भुरळ घातली.
एक काव्यमय कार्यक्रम सम्पन्न झाला, आणि तरुणाई ला कविता आवडतात हे प्रत्येक कवितेगणिक जाणवत राहिलं.
महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ मधुकर शेलार सर यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनात कार्क्रमाचे सुंदर आयोजन करण्यात आले. मा. डॉ.शेलार सरांनी प्रास्ताविक केले,
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. B G वाघ सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले, त्यानी आपल्या छोट्या मिश्किल, विनोदी भाषणाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मा. पवार सर, मा. मते सर, मा. रवींद्र पाटील सर, मा. कोतवाल सर, मा. युवराज ठाकरे सर, मा.उगले सर, सांस्कृतीक विभाग प्रमुख मा. कारे मॅडम आणि इतर मान्यवर उपस्थित होते, डॉ. विभावरी पवार यांनी खुमासदार सूत्रसंचलन केले. एकंदरीत एक बहारदार अविस्मरणीय असा काव्यसोहळा पार पडला…….
