
नांदगाव (वार्ताहार ) “ स्वप्नांना पंख देणारा हा क्षण खास आहे,
आज बुधवार,दि.४ फेब्रुवारी२६ रोजी वैजनाथ जिजाजी विद्यालय, नांदगाव १०वी विद्यार्थ्यासाठी आशीर्वाद समारंभ संपन्न झाला
प्रमुख पाहुणे मा. श्री. अमित चांडक( माजी विद्यार्थी, संचालक, चांडक उद्योगसमूह), अध्यक्ष- मा.श्री. संजीव धामणे सौ .पूनम लोहाडे( उपाध्यक्षा पा .शि .संघ), श्री. अनिल थोरे मा. मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे उपमुख्याध्यापक मा.श्री. डॉ. जोगेश्वर नांदुरकर , शिक्षक प्रतिनिधी श्री. सुरेश नवसारे व श्री.प्रवीण अहिरे,सौ.रूपाली झोडगेकर,सर्वशिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दहावीचा शाळेचा निकाल सर्वोत्तम लागला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

मान्यवरांचा परिचय व स्वागत- श्रीमती. दिपाली सांगळे यांनी केले
विद्यार्थी मनोगत उर्वी आहेर,श्रावणी बोरसे,कु. साक्षी काळ,सिद्धी पवार,करुणा धनवटे, उन्नती इप्पर,साई चोळके
सार्थक यांनी व्यक्त केले
शिक्षक मनोगत-श्री.राजेश भामरे
श्री. सुदेश नरसकर यांनी व्यक्त केले व परीक्षा काळत आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले,

प्रमुख पाहुणे मनोगत श्री. अमित चांडक यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व विद्यार्थ्यांनाही शाळेबद्दल नेहमी कृतज्ञ राहावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.अध्यक्ष मा.श्री. संजीव धामणे सर यांनी आपल्या मनोगतात स्वयंशिस्त, सातत्य याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रति कृतज्ञता व्यक्त करत शाळेला पुढील प्रमाणे भेटवस्तू दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रवीण अहिरे यांनी केले श्री राकेशजी नन्नावरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली
“ आशीर्वादांचा हात सदैव तुमच्या सोबत राहो,
*यशाची प्रत्येक पायरी तुमच्याच नावावर राहो.”
