
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७२ वा दिवस
दौर्बल्याच्या या मोहनिद्रेतून जागे व्हा. आत्मा हा अमित सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आहे. उठा! दृढतेने उभे राहा. हृदयांतरीचे दैवत जागवा. गाढ तमोगुण परम दौर्बल्य, अत्यंतिक मोहनिद्रा यांचे दाट सावट आपल्या राष्ट्रावर पडले आहे. या मोहनिद्रेतून जागे व्हा! ते कसे व्हायचे याचा मार्ग आपल्या अध्यात्मिक ग्रंथांमध्ये आहे. आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून घ्या. इतरांना करून द्या. आपल्यातल्या सुप्त आत्मशक्तीला आवाहन करा. मग पहा ती कशी जागृत होऊन उठते ते! ही सुक्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रूपाने प्रकट झाली म्हणजे प्राप्त होणार नाही असे जगात काय आहे? सामर्थ्य येईल, वैभव येईल, सद्.गुण येतील, शुचिता येईल! जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे काही येईल!
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १६ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६
★ संकष्ट चतुर्थी
★ १२९४ अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीचा किल्ला जिंकल्याने देवगिरीचे वैभवशाली हिंदू साम्राज्याचा अस्त झाला.
★ १९०५ भारतीय समाजवादी पक्षाचे संस्थापक, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांची जन्मदिन.
