
ओझर: दि.4 (वार्ताहर) नांदी फाउंडेशन व बोरस्ते विद्यालय ओझर यांच्या संयुक्त विद्यमाने नंनी कली अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यात संगणक हाताळणी व भविष्यात संगणकामुळे होणारे फायदे, तसेच आरोग्य, शिस्त, वर्तणूक याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात यशस्वी वीस विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, स्कूल बॅगचे वितरण मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या हस्ते देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार, पर्यवेक्षक दशरथ शिंदे, मंगल सावंत, उज्वला जाधव, मेघा शेजवळ, राजश्री मोहन, प्रभाकर लवांड, यश बोरसे आदी सेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन नांदी फाउंडेशनच्या प्रशिक्षक पूजा नेहरे यांनी केले. आभार विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका संगीता शेटे यांनी मानले.
