
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती आणि सदस्यांची निवड मंगळवारी पार पडली या सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सुनील सौंदाणे पीठासन अधिकारी म्हणून, मुख्याधिकारी शामकांत जाधव उपस्थित होते. पालिकेत शिवसेनेचे 20 नगरसेवक असल्याने विषय समिती निवडीचे सर्वाधिकार नगरसेवकांनी आमदार सुहास अण्णा कांदे. आणि समृद्धी बँकेच्या अध्यक्ष सौ अंजुमताई कांदे यांना दिले होते. या वेळी विषय समित्यांचे सभापती व सदस्य पुढील प्रमाणे निवडण्यात आले.
स्थायी समिती
सभापती – नगराध्यक्ष – सागर हिरे
सदस्य – राजेश शिंदे, काशिनाथ देशमुख, रुपाली पाटील,सईद रशीद शेख, ॳॅड.विद्या कसबे
सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती:- काशिनाथ देशमुख
सदस्य:- पृथ्वीराज पाटील, किरण देवरे, स्वाती नावंदर, योगिता सचिन खरोटे,
स्वच्छता,वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती
सभापती:- सौ.रुपाली पाटिल
सदस्य:- बाळासाहेब शेवरे,काका सोळसे, स्नेहल पाटील, दत्तराज छाजेड
नियोजन आणि विकास समिती
सभापती:- राजेश शिंदे
सदस्य :- सौ.वंदना चंद्रशेखर कवडे, श्रीमती जुबेदाबी गफ्फारखान,दिपक पांडव,राखी जाधव
पाणी पुरवठा आणि जलनि:स्सारण समिती
सभापती:- सईद रशीद शेख
सदस्य:- वाल्मीक टिळेकर, गायत्री शिंदे,स्वाती नावंदर,किरण देवरे
महिला व बालकल्याण समिती
सभापती:- ॳॅड.विद्या कसबे
सदस्य:- शोभा कासलीवाल,योगिता खरोटे,गायत्री शिंदे, कल्पना जगताप.

या नंतर नवनिर्वाचित सभापती व सदस्यांनी आमदार सुहास कांदे व समृध्दी बँकेच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. व नगरपरिषद विषय समितीच्या सभापती व सदस्यांनी जनतेची कामे करावी अशी अपेक्षा आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित विषय समिती सभापती व सदस्यांकडे व्यक्त केली.
