
वसंत गोसावी सिन्नर( प्रतिनिधी ): पंचायत समिती सिन्नर यांचे वतीने समावेशित शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी क्रीडा स्पर्धा नुकत्याच अत्यंत उत्साहात पार पडल्या. सिन्नर येथील मुले नंबर एक शाळेत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन सिन्नर मुले नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण देवरे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोळे येथील मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. सरस्वती मातेच्या प्रतिमापूजन करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थिनीने सादर केलेल्या ईशस्तवनाने स्पर्धांचा शुभारंभ झाला.
समावेशित शिक्षणाचा उद्देश दिव्यांग विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणात सामावून घेऊन त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढवणे व समान संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्याच उद्देशाने या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ४५ दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व कला प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :
🔹 वैयक्तिक गायन
सान्वी सहाणे (डुबेरे), रोशन ठोंबरे (वडझिरे), अभिनंदन कराड (पाटोळे)
🔹 धावणे – मुले (५० मीटर)
साई सानप (गुळवंच), रोशन ठोंबरे (वडझिरे), अभिनंदन कराड (पाटोळे)
🔹 धावणे – मुली (५० मीटर)
सिद्धी शिंदे (वडगाव सिन्नर), सान्वी सहाणे (डुबेरे), स्वरा गिते (मेंढी)
🔹 धावणे – मुले
गणेश मोरे (पंचाळे)
🔹 वैयक्तिक नृत्य
हर्षदा आढाव (वडगाव सिन्नर), सान्वी सहाणे (डुबेरे), अर्चना सूर्यवंशी (सिन्नर मुले नंबर एक)
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षण अधिकारी राजेश डामसे, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. विजय बागुल, कैलास सांगळे, सुनिता अहिरे तसेच सर्व केंद्रप्रमुखांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तसेच समावेशित शिक्षण विभागाचे विषय शिक्षक अमित निचित, सुनिल कुह्रे, संतोष आंधळे, विजयकुमार कुऱ्हे, भारत शिरसाठ, जागृती नांद्रे, शरयू तायडे आदींनी स्पर्धांचे उत्कृष्ट संयोजन केले.
या स्पर्धांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या कलागुणांना नवे व्यासपीठ मिळाले, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
