
सिन्नर (प्रतिनिधी ) ४ फेब्रुवारी २०२६ नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या ३५६ व्या बलिदान दिनानिमीत्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अठरा पगड जातीचा लोकांचे योगदान होते त्यापैकी एक नरवीर तानाजी मालुसरे या भारतीय भूमीवर अनेक शूरवीरांनी महान योध्दानी जन्म घेतला आहे. भारताच्या इतिहासामधून महाराणा प्रताप पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांसहित इतर महान योद्धा ज्यांनी आपल्या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढाई केली आणि शेवटपर्यंत लढताना त्यांनी त्यांचे जीवन त्यागून दिले. परंतु दुःखाची गोष्ट ही आहे की आज आपण इतिहासातील त्या वीरांच्या गोष्टींना विसरत आहोत. त्याच योद्धा मधून तानाजी मालुसरे हे एक योद्धा होते.अशा या नरवीर तानाजी मालुसरे यांना विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार गणपत काळे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे विष्णुपंत लोंढे आर.टी.जाधव सोमनाथ लोहारकर सुभाष परदेशी नंदू परदेशी रामदास बोऱ्हाडे भाऊसाहेब शिलावट गणपत काळे दिपक काळे संजूभाऊ शिरसाठ मनोज माळी शरद शिरसाठ किशोर शिरसाठ नाना माळी धनंजय परदेशी अशोक भागवत मधुकर सांगळे पांडुरंग चकोर चंद्रकांत झगडे नाना जाधव राजेंद्र देशमुख नामदेव कुटे बाळासाहेब दराडे आदि उपस्थित होते
