
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१७१ वा दिवस
मनुष्याचे कितीही अधःपतन झाले तरी त्याच्या जीवनात हमखास अशी वेळ येईल की, तेव्हा दुःखयुक्त प्रतिक्रिया होऊन तो आत्मोन्नतीच्या मार्गाला लागेल आणि आत्मविश्वासाचा धडा घेईल. पण हा धडा अगदी प्रारंभीच घेतला तर तो आपल्या दृष्टीने खरोखर श्रेयस्कर आहे. आत्मविश्वास संपादण्यासाठी या सर्व कटू आणि दुःखकारक अनुभवांपासून जाण्याची गरजच काय?
स्वामी विवेकानंद...
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १५ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ४ फेब्रुवारी २०२६
★ संत श्री नरहरी सोनार महाराज पुण्यतिथी
★ १६७० स्वराज्य रक्षणासाठी “आधी लग्न कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे” म्हणून विडा उचलणारे नरवीर तान्हाजी मालुसरे यांना कोंडाणा किल्ल्यावर (सिंहगड) वीरमरण.
★ १९२२ स्वरभास्कर पंडित भिमसेन जोशी यांचा जन्मदिन.
★ २००२ सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक भगवान आबाजी पालव उर्फ मास्टर भगवान यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक कर्करोग निवारण दिन.
