
सिन्नर ( प्रतिनिधी)०३ फेब्रुवारी २०२६ आद्यक्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या १९४ व्या शहिद दिनानिमित्त महामित्र परिवार रामोशी महासंघ सिन्नर व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड, यांच्या वतीने त्यांना सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले.

आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे क्रांतिवीर भागोजी नाईक यांच्या त्रिशील्पास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की आद्यक्रांतिकारक उमाजी राजे नाईक,राघोजी भांगरे,भागोजी नाईक हे समकालिन क्रांतिकारक होते.त्यांनी जनतेची पिळवणुक करणा-या जुल्मी अत्याचारी इंग्रज राजवट, सावकार,जमिनदार,वतनदार यांच्याविरूध्द बंड पुकारले होते.उमाजी राजे नाईक यांनी जनतेचे शोषन करणा-यांना लुटून गोरगरीबांना आर्थिक मदत करत होते.कोणत्याही स्रीवर अन्याय अत्याचार झाल्यास ते त्या विरूध्द लढा देत होते.देशाला परकियांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी त्यांनी ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. लोक त्यांना प्रती शिवाजी महाराज म्हणु लागले. पुढे फंद-फितुरीमुळे उमाजी राजेंना पकडले गेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला व त्यांना दोषी ठरवुन ३ फेब्रुवारी १८३२ ला फाशी देण्यात आले.अशा या आद्यक्रांतीवीरास विनम्र अभिवादन!
याप्रसंगी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांच्या जीवनावर विनायक शेठ बिन्नर जगन्नाथ कटारनवरे रमेश वाघ लाला जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे यांनी केले.व प्रास्ताविक नामदेव मचकुले तर आभार भागवत गोफने यांनी मानले
यावेळी , महामित्र दत्ता वायचळे, महाराष्ट्र रामोशी महासंघाचे उपाध्यक्ष नामदेव मचकुले विनायक शेठ बिन्नर राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे, जगन्नाथ कटारनवरे अनिल मंडले बाळू मोरे भागवत गोफने संतोष जडगुले लाला जाधव रमेश वाघ सौ वंदना लाला जाधव प्रभाकर गाडेकर,शरद जाधव, सचिन आवारी, मयुर बैरागी, आदि उपस्थित होते.
