
सिन्नर (प्रतिनिधी )२ फेब्रुवारी २०२६ सुभेदार रामजी मालोजी (सपकाळ ) आंबेडकर स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार व संविधान प्रेमी यांच्या वतीने सिन्नर येथे विनम्र अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास व रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमालने मानवंदना देण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सुभेदार रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. अस्पृश्यतेचा सामना करण्यासाठी रामजींनी आपल्या मुलांना, विशेषतः बाबासाहेबांना, उच्च शिक्षण मिळावे यासाठी खूप मेहनत घेतली व मुलांना शिकण्यासाठी प्रोत्साहित केले.
मृत्यू: २ फेब्रुवारी १९१३ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. रामजी सकपाळ डॉ. आंबेडकरांच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मुलांना सुसंस्कारित आणि सुशिक्षित केले. त्यामुळे आपल्या भारताला संविधान लिहिणारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मिळाली अशा महान रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
सामुदायिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर एन जाधव यांनी केले व प्रास्ताविक मंगेश जाधव यांनी केले तर आभार प्रभाकर जाधव यांनी मानले
याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे आर एन जाधव (आर पी आय) तालुक अध्यक्ष मंगेश जाधव प्रभाकर जाधव धम्मपाल शिरसाट राजेंद्र दिवे विजय मुठे पोपट( तात्या) जाधव लक्ष्मण म्हस्के पांडुरंग खडसे मिलिंद साळवे धोंडीराम जगताप भरत जाधव रोहित केवार आदि उपस्थित होते
