
मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव चे कलाशिक्षक विजय देशमुख यांना सन्मानित करताना संस्थेचे तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील, विजय काकळीज, हरिश्चंद्र ठाकरे, ज्योती काळे, व शिक्षक वृंद
नांदगाव:- (वार्ताहर) महाराष्ट्र राज्य कला परीक्षा संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘एलिमेंटरी’ व ‘इंटरमिजिएट’ ग्रेड परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर १०० टक्के यशाची परंपरा कायम राखली आहे.
यावर्षी विद्यालयातून एलिमेंटरी परीक्षेसाठी ६२ आणि ४२ परीक्षेसाठी १०४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम श्रेणी मिळवून यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ‘अ’ श्रेणी प्राप्त करून विद्यालयाचे उज्ज्वल केले.
विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेचे कला शिक्षक श्री विजय देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी वर्षभर विद्यार्थ्यांकडून वस्तुचित्र,संकल्पचित्र , स्मरणचित्र आणि भूमिती या विषयांचा सराव करून घेतला होता.
या यशाबद्दल बोलताना मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे -पाटील म्हणाले की, “केवळ अभ्यासातच नव्हे, तर कला क्षेत्रातही आमचे विद्यार्थी अग्रेसर आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला हे यश मिळाले आहे.”
यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे श्री विजय देशमुख यांचे मविप्र संस्थेचे संचालक इंजि अमित भाऊ बोरसे पाटील, श्री विजय काकळीज (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती) मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे,सर्व शिक्षक, पालक यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
