
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव शहरातील गांधीनगर परिसरात संत श्री रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. समाजात समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले.
या जयंती सोहळ्यात लहान मुलांना पुढाकार देत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांच्या सहभागातून संतांचे विचार, अभंग व संदेश सादर करण्यात आले. यामुळे नव्या पिढीत संस्कार रुजवण्याचा सकारात्मक उपक्रम समाजबांधवांनी राबविला.

कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शांतता, एकता आणि सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.अलोक सोनवणे. कृष्णा उमरे. सनी उमरे. श्लोक सोनवणे. दिपक आहिरे. आकू पवार. दर्शन पवार.शिवराज आहिरे. या बालकांनी ही जयंती साजरी करण्यात उत्साह दाखवला. या प्रसंगी आयोजकांनी संतांच्या कार्याचा गौरव करत समाजाने त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडला.
