
सिन्नर (प्रतिनिधी )२फेब्रुवारी २०२६ राष्ट्रसंत समाजसुधारक तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की
संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही लाखो लोकांच्या जीवनात प्रेरणा देतात. त्यांचे विचार सोपे, सरळ आणि हृदयस्पर्शी आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांनी हजारो अभंग रचले, जे आजही वारकरी कीर्तन, भजनात गायले जातात. अभंगांमध्ये सामान्य माणसाच्या भाषेत भक्ती, नीती, समाजसुधारणा, ईश्वरभक्ती, गुरुमहिमा, वैराग्य अशा विषयांचे सुंदर वर्णन आहे. ते जातिभेद, अंधश्रद्धा, पाखंड यांचे कठोर विरोधक होते. त्यांचे आराध्यदैवत पंढरपूरचे विठोबा होते. त्यांच्या अभंगांनी मराठी भक्ती साहित्यला अमूल्य योगदान दिले.अशा महान राष्ट्रसंत समाजसुधारक तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रकाश माळी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी केले.तर आभार मनोज माळी मानले

यावेळी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे डाॅ.आर टी जाधव, प्रकाश माळी, मनोज माळी, सोमनाथ लोहारकर, सुभाष परदेशी, नंदू परदेशी, रामदास बोऱ्हाडे, भाऊसाहेब शिलावट ,गणपत काळे, दीपक काळे, संजूभाऊ पोटे ,नितीन शिरसाट ,शरद शिरसाट, किशोर शिरसाट, धनंजय परदेशी ,अशोक भागवत , पांडुरंग चकोर, चंद्रकांत झगडे, नाना जाधव, राजेंद्र देशमुख (पाटील ) नामदेव कुटे बाळासाहेब दराडे ,मोया गुर्वॅ ,विजय गुर्वॅ बापू चव्हाण बापू वैद्य आदी उपस्थित होते
