
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६९ वा दिवस
जगाचा भार घेण्यास तुम्ही खरोखर सिद्ध असाल तर तसे अवश्य करा. मात्र नंतर कुरकुर आणि तक्रार चालणार नाही तुमच्या दुःखाचा असा नको तो बडेजावपणा करू नका, की ज्यामुळे आम्हाला वाटेल की आपण आपापली ओझी घेऊन चाललो आहोत तेच बरे होते! ज्याला खरोखरच जगाचा भार वाहायचा आहे, तो जगाला शांतपणे आशीर्वाद देतो. आपल्या मार्गावरून चालत राहतो. त्याच्या तोंडी धिक्कार किंवा टीका यांचा शब्दही नसतो. याचा अर्थ त्याच्या वाट्याला काही दुःख आलेले नसते असे नाही. पण ते त्याने स्वच्छेने स्वीकारलेले असते. तो महात्मा आपल्या मार्गावरून आनंदाने पुढे चाललेला असतो आणि ज्याच्यासाठी त्यांनी जन्म घेतलेला असतो ज्यांच्यासाठी त्याने जन्म घेतलेला असतो, ज्यांच्यासाठी तो कष्ट सोसत असतो ते मात्र कण्हत-कुथत असतात.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १३ शके १९४७
★ माघ वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६
★ माघ पौर्णिमा (दांडी पौर्णिमा) कुळधर्म
★ संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज जयंती
★ श्री दत्त यात्रा नृसिंहवाडी गाणगापूर
★ १९१७ लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य, महर्षी आण्णासाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन.
★ १९७१ इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर जागतिक पाणथळ भूमी दिन म्हणून साजरा केला जातो.
★ जागतिक पाणथळ भूमी दिन.
