नाशिक:(प्रतिनिधी )- पळसे परिसरात शिक्षण, संविधान, सेवा, साहित्य, संस्कृती या क्षेत्रात कृतिशील भरीव काम करणाऱ्या ग्रामाभिमान मंचच्या अध्यक्षपदी सुनील सोमनाथ आगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सन २०२६ ते २०२८ या कार्यकालासाठी ही निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी श्रीराम पगार, खजिनदारपदी प्रवीण गायधनी, सचिवपदी समाधान गायधनी सहसचिवपदी ओमकार गायधनी, प्रसिद्धी प्रमुखपदी सोहम गायधनी यांचीही निवड करण्यात आली. कार्यकारणी सदस्य म्हणून प्रदीप गायधनी, राहुल फडोळ, गणेश आगळे, रोहित पगार, रवी टिळे, मंगला गायकर, करुणा जाधव, विकास गायधनी, नाना सरोदे, मानसी गायधनी, प्रदीप ढेरिंगे, भारत टिळे, मोनू आगळे, निलेश गायधनी, सुनील बन्सीलाल गायधनी, अक्षय शिंदे, भास्कर चौधरी, प्रमोद गायधनी इत्यादी काम पाहणार आहे. नवीन कार्यकारणीने मंचाच्या कार्यास साजेसे काम करून मंचासह समाजाच्या उन्नतीस प्रयत्नशील रहावे, असे मत व्यक्त करून मंचाचे मावळते अध्यक्ष प्रमोद गायधनी यांनी सर्व निवनियुक कार्यकरणीचे अभिनंदन केले.
फुलाची पाकळी हा शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम, कौतुकाची थाप यात परिसरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यशस्वी लोकांचा सत्कार, विविध शाळा-महाविद्यालयांत जनजागृती व्याख्यान इत्यादी कार्यक्रम राबवून अल्पावधीत पंचक्रोशीत ठसा उमटवणाऱ्या मंचाच्या कार्यास कवी रवींद्र मालुंजकर, महाराष्ट्र माझाचे संस्थापक विकास भागवत आणि अध्यक्ष शिवनाथ कापडी, भारत ज्ञान विज्ञान समुदायाचे लक्ष्मण जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गणेश गायधनी, वैभव पतसंस्थेचे बाळासाहेब गायधनी, पत्रकार सुनील पवार, जाखोरीच्या विचारक्रांती वाचनालयाचे सुहास खाडे, विहितगावच्या सुभाष वाचनालयाचे शिवाजी हांडोरे आदी मान्यवरांचे विविध उपक्रमांत सहकार्य असते. नवीन कार्यकरणीचे विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.