
अंदरसूल (प्रकाश साबरे ) सामाजिक आरोग्याचे ‘वैद्यकीय’ मॉडेल
डॉ. तारु यांनी समाजाच्या कार्यप्रणालीला मानवी रक्ताभिसरण प्रक्रियेशी जोडले आहे:
पत्रकारिता (हृदय): ज्याप्रमाणे हृदय संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करून जिवंत ठेवते, त्याचप्रमाणे पत्रकारिता समाजात माहिती आणि विचारांचा प्रवाह जिवंत ठेवण्याचे काम करते.
शिक्षित व संघटित समाज (स्नायू/Muscles): वैद्यकीय परिभाषेत, पायांचे स्नायू जेव्हा आकुंचन पावतात, तेव्हाच रक्त पुन्हा हृदयाकडे (Venous Return) वेगाने पोहोचते. त्याचप्रमाणे, जेव्हा समाज शिक्षित आणि संघटित होऊन हालचाल करतो, तेव्हाच ‘सामाजिक रक्ताभिसरण’ नीट राहते आणि समाजाचे आरोग्य टिकून राहते.
प्रमुख पाहुणे डॉ राजीव कुमार (HOD पटना मेडिकल कॉलेज) चेअरमन ऑल इंडिया नाग असोसिएशन पटना बिहार होते. अध्यक्ष बी बी मेश्राम, फुले शाहू , आंबेडकराईत स्टडी फाऊंडेशन हे होते. मूकनायक वर्तमान पत्र 105 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने डॉ आंबेडकर लॉ कॉलेज छ संभाजी नगर येथे परिसंवाद आयोजित करण्यात आला होता
