
दोडी बुद्रुक येथील जत्रेत नवसापोटी उघड्यावरील पशूबळी विरोधात प्रबोधन करताना अंनिसचे कार्यकर्ते..
दोडी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे दोडी बुद्रुक, ता. सिन्नर येथील म्हाळोबा जत्रेतील नवसापोटी उघड्यावरील पशूबळी विरोधात लोक प्रबोधन करण्यात आले.
दोडी येथील प्रबोधनाचे हे २६ वे वर्ष.
अंनिसने भाविक भक्तांचे सातत्याने प्रबोधन केल्यामुळे यावर्षी नवसपूर्ती म्हणून पशूबळी देण्याच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचे प्रत्यक्षात दिसून आले . आज सकाळपासून अडीचसे (२५०) बोकड बळी दिले गेले असे बळी देण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने नोंदीवरून सांगितले.मात्र तरीही उघड्यावरील पशूबळी देण्याचा प्रकार चालूच होता.ही बाब डॉ. गोराणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली .येणाऱ्या भाविक भक्तांना कार्यकर्त्यांनी पत्रकं वाटून त्यांचे प्रबोधन केले .चर्चा, संवाद घडवून आणला.शंकाचे निरसन केले.दैवताला नवस करून पशूपक्ष्यांचा बळी देण्याची प्रथा परंपरेने आली असले तरी ती आता कालबाह्य झाल्याचे प्रबोधनानंतर अनेक भाविकांनी मान्य केले.

या प्रबोधन कार्यक्रमांमध्ये अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, रंजन लोंढे ,रत्नकांत पवार, विजया गोराणे, प्रमोद काकडे,आयुष काकडे,वेदिका काकडे आदी सहभागी होते.
