
वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ – प्रतिभा खैरनार (नांदगाव, नाशिक) यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार
नांदगाव| (प्रतिनिधी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे सर्व वाङ्मयीन पुरस्कार २०२५-२६ या वर्षासाठी जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रतिष्ठेचा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार तसेच कथा, कादंबरी, ललित लेखन व चरित्र लेखन क्षेत्रातील मान्यवर साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार (सर्वोत्कृष्ट कवितासंग्रह)
हा पुरस्कार पुढील साहित्यकृतींना जाहीर झाला आहे –
‘लाकडाचे कान’ – प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख (पुणे)
‘निर्जनांचे प्रदेश’ – संतोष दौंडे (अहिल्यानगर)
‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ – प्रतिभा खैरनार (नांदगाव, नाशिक)
‘ऋतुसमिधांच्या आर्द्रा’ – संतोष विठ्ठल घसिंग (बीड)
‘शापित कोलाहालाच्या नोंदी’ – अरविंदा भामरे (धुळे)
(पुरस्काराचे स्वरूप : रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ)
कै. शंकर पाटील स्मृती कथासंग्रह पुरस्कार
‘खरा वारस’ – हरिश्चंद्र पाटील (टेंभुर्णी, सोलापूर)
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मृती कादंबरी पुरस्कार
‘रानोबाचा माळ’ – ऋषिकेश गोल्हार (छत्रपती संभाजीनगर)
प्रा. चंद्रकुमार नलगे ललित लेखन पुरस्कार
‘एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ – संगीता अरबुने (मुंबई)
डॉ. आनंद यादव स्मृती आत्मकथन / चरित्र पुरस्कार
‘साहेबांच्या सहवासात’ – विजय घोलपे (कोल्हापूर)
वरील सर्व पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठरवलेल्या नियोजित तारखेला मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार असून, पुरस्कार वितरणाची तारीख, वेळ व ठिकाण याची माहिती पुरस्कार विजेत्यांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे.
ही माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद, राजगुरूनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे, कार्यवाह शरद बुट्टे-पाटील व उपाध्यक्ष सदाशिव आमराळे यांनी दिली.
