
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या रोडू अण्णा गोविंदराव पाटील वरिष्ठ महाविद्यालय जळगाव निं येथे
“मन चंगा तो कठौत मै गंगा” अस म्हणणारे
संत रविदास महाराज यांची जयंती करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मा.महेंद्र रोडू अण्णा पाटील हे होते. या समवेत संस्थेच्या अध्यक्षा कासुताई रोडू अण्णा पाटील,समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य श्री.सद्दाम अली अन्सारी , सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमावेळी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व्हि.डी. काळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. ‘.यावेळी प्रा. सुदय बोरसे,प्रा.योगेश ठोके ,प्रा. शारिक सर,एन.एस.एस.प्रमुख निसार सर, वानखेडे सर ,आर के काका उपस्थित होते.

यावेळी जळगाव नि गावचे पोलिस पाटील सुनील रामदास कोरे हे सुद्धा उपस्थित होते.यावेळी त्यांनी संत रविदास महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती दिली .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक बोरसे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.प्रशांत देवरे यांनी केले .आणि कार्यक्रमांचे आभार प्रा.अमोल अहिरे यांनी केले.आणि वंदे मातरम् घेऊन अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
