
नांदगाव (प्रतिनिधी) अजित दादा पवार यांच्या अचानक निधनाने नांदगाव मतदारसंघाचे आणि माझे वैयक्तिक मोठे नुकसान झाले आहे असे प्रतिपादन आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नांदगाव येथील गुप्ता लाॅन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभे प्रसंगी केले.

ते पुढे म्हणाले की दादांनी माझ्या मतदारसंघाच्या विकास कामाच्या फाईल कधीच अडवल्या नाहीत कोरोना काळात देखील करंजवण पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देताना हात आखडता घेतला नाही अपघात होण्याच्या तीन दिवस अगोदरच मतदारसंघातील विकास कामासंदर्भात त्यांच्याशी भेट झाली होती त्यांच्या अकाली जाण्याने नांदगाव मतदारसंघाचे व माझे मोठे नुकसान झाले असल्याची भावना आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केली.

यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, माजी आमदार ॳॅड. अनिल दादा आहेर, संजय पवार, समृध्दी बँकेच्या चेअरमन अंजुम ताई कांदे,

मविप्र संचालक अमित बोरसे पाटील, नगराध्यक्ष सागर हिरे, मनमाडचे नगराध्यक्ष योगेश पाटील,भाजपचे तालुकाध्यक्ष संजय सानप, दत्तराज छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, देवदत्त सोनवणे, शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख संतोष गुप्ता,काॅंग्रेसचे हरेश सुर्वे, मनोज चोपडे, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव,मनमाड शहर प्रमुख मयुर बोरसे,महिला आघाडीच्या रोहीणी मोरे,आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले, राजेंद्र पवार, बाळासाहेब महाजन,सतीष बोरसे,संजय आहेर, अनिल सोनवणे, शिवाजी जाधव,नाना जाधव, मधुकर गिते , अंकुश कातकडे, किशोर लहाणे, रामदास पवार, विद्या कसबे, डॉ.यशवंत गायकवाड,कपिल तेलुरे, डॉ.सांगळे, अनिल रिंढे,उदय पवार,मनसेचे सचिन शिरोडे, मारुती जगधने, समाधान पाटील, वाल्मीक जगताप, विष्णू निकम, रमेश बोरसे, सचिन पांडे,आदींनी अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.

विकास कामावर भर देणारा नेता हरवला अनेकांच्या अजितदादांच्या बद्दलची श्रद्धांजली अर्पण करतांना भावना अनावर झाल्या. यावेळी नांदगाव मतदार संघातील विविध पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.


