
नांदगाव (प्रतिनिधी): येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज कंपाऊंडमध्ये जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव आणि जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव सहेली (जायंट्स फेडरेशन २-ब) यांचा सन २०२६ चा भव्य ‘शपथग्रहण समारोह’ शनिवारी, ३१ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर मा. श्री. नंदकुमारजी घोडेले आणि माजी नगरसेविका मा. सौ. अनिताताई घोडेले उपस्थित होते. तसेच, प्रमुख उपस्थिती म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मा. श्री. सुहासअण्णा कांदे, आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष मा. श्री. सागर मदनरावजी हिरे यांनी उपस्थित राहून नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारिणीचा पदभार
या सोहळ्यात सन २०२६ साठी खालील नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली:
जायंट्स ग्रुप (पुरुष): श्री. विजय पन्नालालजी बागरे (अध्यक्ष), श्री. सोमनाथ घोंगणे, श्री. कमलेश किलोसिया, श्री. प्रसाद बुरकुल आणि श्री. संजय कलंत्री.
सहेली ग्रुप (महिला): सौ. संगिता विजयजी बागरे (अध्यक्षा), श्रीमती सुनिता बाविस्कर, सौ. जयश्री पटेल, सौ. निवेदिता बुरकुल आणि सौ. पुष्पा दुसाणे.
विशेष उपस्थिती व मार्गदर्शन
कार्यक्रमाला फेडरेशन २-ब चे नूतन अध्यक्ष श्री. जुगलकिशोरजी हरकुट आणि नूतन सचिव श्री. सन्मतीजी जैन यांची विशेष उपस्थिती होती. तसेच एन.सी.एफ. सदस्य श्री. विनोदजी शेवतेकर,श्री. जगन्नाथ साळुंके आणि श्री. लहुजी पाटील, श्री. रत्नाकर महाजन, श्री. नरेश गुप्ता उपस्थित होते. शपथविधी अधिकारी म्हणून श्री. सुमित गुप्ता यांनी काम पाहिले.
उत्कृष्ट सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे नेटके आणि प्रभावी सूत्रसंचालन श्री. प्रसाद बुरकूल सर व श्री. दत्तराज छाजेड यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रमात रंगत आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मावळते अध्यक्ष श्री. सोमनाथ दुसाणे आणि सौ. वैशाली दुसाणे यांच्यासह सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. समारंभाची सांगता ‘सुरूची भोजनाने’ झाली. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जायंट्स परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
