
ओझर:दि.31(वार्ताहर)
येथील बोरस्ते विद्यालयात मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा पार पडली. प्रास्ताविक समिती प्रमुख मनीषा मोगल यांनी केले. याप्रसंगी पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपमुख्याध्यापक सतीश केदार यांनी शालेय अडचणीत संदर्भात माहिती दिली. सहविचार सभेचे अध्यक्ष मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी शालेय कामकाज संदर्भात सविस्तर आढावा घेतला. येणाऱ्या एसएससी परीक्षेचा अभ्यासक्रम, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा, आसनव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, कॉपीमुक्त परीक्षा या विषयावर शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले. आभार ज्येष्ठ शिक्षक महेंद्र डांगले यांनी मानले.

