
मालेगाव( प्रतिनिधी )मालेगाव येथील विख्यात राष्ट्रीय कवी व लेखक समीक्षक संजय मुकुंद राव निकम यांच्या प्रकाश पर्व या एक शब्दक्षरी काव्य संग्रहाचे प्रकाशन मुंबई येथील सुप्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर आणि अरुण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दि. 27/1/2026 मंगळवार रोजी रात्री 9 वाजता कॅम्प सार्वजनिक वाचनालय कॅम्प, मालेगाव जि नासिक येथे भर गच्च रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ऍड. भास्कर तिवारी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्रोत्यांना करून दिला. राजेंद्र भोसले यांनी अरुणजी म्हात्रे यांचा शाल श्रीफळ गुलाब गुच्छ देऊन सत्कार केला. सुप्रसिद्ध लेखक विनोद गोरवाडकर यांनी अशोक नायगाव कर यांचा सत्कार केला. राष्ट्रीय कवी संजय निकम यांची महाराष्ट्र भूषण मायमराठी, आभाळ माया, गोदाकाठ, हे तीन मराठी काव्य संग्रह, तसेच ठिणगी ही मराठी कादंबरी प्रकाशित झाली आहे. तसेच गीत नया मै गाता हूँ l व मेरा भारत या हिंदी कवितानी राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवली आहे. माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात राष्ट्रीय कवी संजय निकम यांचा खारीचा वाटा आहे.मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही निकम यांच्या कवितेचे कौतुक केले आहे. यावेळी कार्यक्रम मोठ्या आनंदी वातावरणात सुरु झाला. हास्य कवी अशोक नायगाव कर यांनी लोक मान्य टिळक आणि मला भाजप मध्ये जायचं. स्वयंपाक घर व गृहिणी यांच्या वर ही विनोदी कविता सादर सर्वांना खळखळून हसवले. अनेक विनोदी कविता ऐकून रसिक श्रोते आनंदाने न्हाऊन गेले.कवी वर्य अरुण म्हात्रे यांनी तेव्हा फुले बोलायची आणि रमाबाई रानडे यांच्या वर रच लेली झोका ही साता समुद्रपार गाजलेली कविता ऐकून गृहिणी आणि अबाल वृद्धाना मुलां मुलीना तरुणांना तरुणीना भारावून सोडले. पाडगांवकर, सुर्वे, महानोर,वसंत बापट, आणि अनेक कवीच्या खास शैलीतील कविता एकवून त्यांनी उपस्थिताची मने जिंकली. पत्रकार रविराज सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम मालेगाव कॅम्प येथे मोठया उत्साहात आणि जलोष पूर्ण वातावरणात साजरा झाला.
