
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६८ वा दिवस
मला एवढे खात्रीने वाटते, की माझ्या आयुष्यातली कोणतीच प्रेरणा व्यर्थ ठरलेली नाही; मग तिला योग्य मार्गदर्शन मिळालेले असो वा नसो. माझ्या इष्ट-अनिष्ट सर्व भूतकाळाचे मी फलित आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या आहेत. पण या चुका केल्या नसत्या तर आज मी जो आहे तो तुम्हाला दिसलो नसतो. मला असे म्हणायचे नाही की आता घरी जा आणि सुखेनैव चुका करत सुटा. असा गैरसमज करू नका पण आपल्या हातून चुका झाल्या म्हणून हिरमुष्टी होऊ नका. शेवटी योग्य तेच घडेल अशी श्रद्धा ठेवा. अन्य काही घडूच शकत नाही. कारण आपले मूळ स्वरूप सत् आहे. पावित्र्य हा आपला स्वभाव आहे आणि तो कशानेच बदलणार नाही. स्वभाव हा नित्य, अपरिवर्तनीय असतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १२ शके १९४७
★ माघ पौर्णिमा
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६
★ माघ पौर्णिमा (दांडी पौर्णिमा) कुळधर्म
★ संत रोहिदास जयंती.
★ गुरु रविदास जयंती.
★ १६८९ गणोजी शिर्के याच्या मदतीने मुघल सरदार नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केले.
★ १८८४ वैदिक शास्त्राचे अभ्यासक, मराठी कोशकार, महामहोपाध्याय “विद्यानिधी” सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्मदिन
★ २००३ भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचा स्मृतीदिन.
★ भारतीय तटरक्षक दल स्थापना दिवस.
