
अंदरसूल (प्रकाश साबरे)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बुधवार दि.२८ रोजी बारामती मध्ये सकाळी लँडिंग करताना विमानाचा अपघात झाल्याने या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिवंगत झाले.महाराष्ट्राचा मुख्य नेता हरपल्याने अख्खा महाराष्ट्र शोकमग्न झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अंदरसूल येथे ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला.

यावेळी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.दरम्यान जि. प. माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे माजी सदस्य महेंद्र काले, जेष्ठ नेते किसनराव धनगे, युवा नेते मकरंद सोनवणे, एडवोकेट बाबासाहेब देशमुख, जेष्ठ पत्रकार प्रकाश साबरे, रामभाऊ वडाळकर, हरिभाऊ जगताप,दीपक जगताप, महेश देशमुख, योगेश जहागीरदार, गोरख नेवासाकर यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याला उजाळा दिला.

असा नेता पुन्हा होणे नाही अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी सुदाम सोनवणे, श्रीकिसन दायमा, अशोक काळे, सुनील देशमुख, अमोल सोनवणे, संतोष केंद्रे,मारुती वाकचौरे,जगन जगताप,सोमनाथ रोकडे,केशव देशमुख, जनार्दन पागिरे, शरद जगताप,संतोष खैरनार,रंगनाथ वाकचौरे,

अनिल सोनवणे,संपत धनगे,दीपक सैंद्रे, दिनेश पागिरे, नंदकिशोर धनगे, संतोष मुथा, संतोष ढमाले, शिवाजी मुंगसे, लक्ष्मण वडाळकर आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
