
नाशिक (प्रतिनिधी ) के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, काकासाहेब नगर येथे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने, सी.व्ही. लेखन व लिंकडीन वापर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना व्यावसायिक पद्धतीने सी.व्ही. तयार करण्याचे व लिंकडीनचा प्रभावी वापर करण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना अवगत व्हावे हाच हेतू ठेवून हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला .
या दोन दिवशीय प्रशिक्षण सत्रांत डॉ. प्रतिभा चांडक, प्रा. समीक्षा तिवारी व प्रा. पवन मलानी या प्रशिक्षकांनी पीपीटीच्या माध्यमातून प्रभावी सी. व्ही. लेखन, मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्ये व करिअरविषयक मार्गदर्शन याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ एकूण ८८ विद्यार्थ्यांनी घेतला.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अतुल गवारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. अरुण ठोके यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. सुनीता शिरसाठ व प्रा. काजल वाघ यांनी केले. आभार प्रा. मुक्ता मोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. बी. शिरसाठ , प्रा. एम.एन. आहेर, श्री. अविनाश आव्हाड आदीनी परिश्रम घेतले.
