
मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात हुतात्मा दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर जवानांना अभिवादन करताना मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक वृंद.
नांदगाव:- ( वार्ताहर) मविप्र समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ‘हुतात्मा दिन’ अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यावेळी उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या दिवशी सकाळी ११ वाजता विद्यालयात २ मिनिटांचे मौन पाळले गेले.

मुख्याध्यापिका ज्योती काळे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या की,”गांधीजींचे विचार आजही जगाला दिशा देणारे आहेत. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता, त्यांच्यातील निर्भयता आणि स्वावलंबन हे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारावेत , हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
आजचा ह्या दिवसी गांधीजींना व देशाच्या स्वातंत्र्यासाठी, संरक्षणासाठी आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या प्रत्येक सैनिकांना आणि क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली जाते.
या निमित्ताने अहिंसा, सत्य आणि देशप्रेमाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
