
ओझर: दि. 30( वार्ताहर)देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी ओझर येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी ठीक अकरा वाजता दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ क्रीडाशिक्षक प्रभाकर लवांड उज्वला जाधव मनोरमा सोमवंशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. फलक लेखन कलाशिक्षिका सविता पवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी अतिशय गांभीर्याने हुतात्मा दिनानिमित्त मौन पाळण्यात आले.
