
विंचूर दि.२७(प्रतिनिधी) येथील मातोश्री कै हौसाबाई वामनशेठ दुसाने महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हळदी कुंकवा निमित्त महिलांना आकर्षक भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असणा-या मातोश्री कै.हौसाबाई दुसाने पतसंस्थेच्या वतीने महिलांसाठी विवध कार्यक्रम आयोजित केले जातात.

हळदी कुंकू म्हणजे महिलांच्या आदराचा व सन्मानाचा विषय तसेच सामाजिक सलोखा जपण्याचा क्षण म्हणजे हळदी कुंकू समारंभ. ह्यामध्ये सर्वच महिलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. यात महिलांचे संघटन तथा उपक्रमशिल नियोजन महत्त्वाचे असते. जे महिलांना सामाजिक व मानसिक आधार देते. महिला हि राष्ट्राची सर्वोत्तम शक्ती. तीचा सन्मान हा महत्वाचा असतो. असे संस्थेच्या चेअरमन वैशाली दुसाने यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेअरमन वैशाली दुसाने, व्हा. चेअरमन ज्योती शिरसाट, संचालिका गायत्री साईनकर, रेणुका दुसाने, योगिता गाडे, ज्योती कानडे, स्मिता खांदोडे, वनिता गांगुर्डे, ताराबाई क्षिरसागर, अर्चना पिंगळे, वैष्णवी साईनकर, पुजा उशिर, प्रतिक्षा हरदास, निकिता मंडलीक, कावेरी बैरागी यांनी परिश्रम घेतले. या हळदीकुंकू कार्यक्रमासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहुन सौभ्याग्याचे वाण घेतले.
