
विंचूर दि.२८(प्रतिनिधी) येथील आदित्य दत्तात्रय दरेकर याने हरीद्वार येथे झालेल्या डेड लिफ्टींंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. यानिमित्त आदित्य दरेकर याचा विंचूरकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंतनु पाटील हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून भारतमाता आश्रमाचे स्वामी जनेश्वरानंदजी महाराज, लासलगाव कृ.उ.बा. च्या संचालिका सोनिया होळकर,रा.सा.का.चे माजी चेअरमन शंकरराव कोल्हे,विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, संजय शेवाळे,अँड संजय दरेकर, किशोर दरेकर,गोपनीय ठुबे, रणजित गुंजाळ, ह.भ.प. निलेश महाराज पवार, प्राचार्य नंदकुमार देवढे हे होते. यावेळी स्वामी जनेश्वरानंद महाराज,सोनिया होळकर,रणजित गुंजाळ,संजय शेवाळे, नंदकुमार देवढे, ह.भ.प. निलेश महाराज पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दरम्यान आकाश रायते यांच्या RA LEGACY CAPITAL या शेअर मार्केट शाखेचे उद्घाटन करण्यात आले.सत्कारास उत्तर देताना आदित्यने काही खेळाडू स्टेरॉइड सारखे अंमली पदार्थ वापर करतात. मात्र आम्ही खिलाडी वृत्ती व जिद्दीने हे यश संपादन केल्याचे सांगत.खेळाडूंना योग्य ते मार्गदर्शन व आवश्यक सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.तर शंतनु पाटील यांनी मी स्वतःला कमी लेखनार नाही, आणि मी हे करून दाखवणारच असा आत्मविश्वास जिद्द व चिकाटीच्या बळावर आदित्यने सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल मिळवल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले. यावेळी पंढरीनाथ दरेकर,राजाराम दरेकर, अशोक दरेकर,मोतीराम दरेकर,ज्ञानेश्वर भडांगे, राजाभाऊ दरेकर, विनायक रायते,बाळासाहेब पवार, दत्तात्रय दरेकर,आण्णासाहेब रायते,ज्ञानेश्वर पवार, पुंजाराम खाडे,सुरज भट्टड,संतोष रायते, सुनिल चव्हाण, विजय दरेकर, दौलत दरेकर,गोविंद शिरसाट, इम्रान मोमीन, किशोर जेऊघाले,फिरोज मोमीन, रत्नाकर दरेकर, आकाश रायते, सुनिता रायते, सुनंदा दरेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि बी काद्री यांनी केले.तर हर्षल काळे यांनी आभार प्रदर्शन केले.
