
विंचूर दि.२७ (प्रतिनिधी)भारतीय प्रजासत्ताक दिन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने येथील शैक्षणिक, सामाजिक, सहकारी संस्थांच्या वतीने राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.तसेच शैक्षणिक संस्थांच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती.
विंचूर ग्रामपालिका
विंचूर ग्रामपालिकेचे ध्वजारोहण सरपंच सचिन दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच प्रविण चव्हाण, सदस्य मिराताई गोरे, वनिता गांगुर्डे, राजेंद्र मोरे, सुमनताई दरेकर, प्रिती गायकवाड, दिलीप चव्हाण,शिरीन मोमीन, दत्तात्रय व्यवहारे, शोभा बोराडे, मंगला खैरे, पुजा जेऊघाले, नानासाहेब जेऊघाले, संतोष जाधव,सुवर्णा गोरे,निरज भट्टड,विलास गोरे, रमेश बोराडे,ग्रामपंचायत अधिकारी राघोजी मगर, मुख्य लिपिक राजेंद्र शिंदे,दत्तात्रय खाडे,मयुर जाधव मिलिंद वाघ,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
विंचूर पोलीस चौकी
विंचूर पोलीस चौकीचे ध्वजारोहण पोलीस उपनिरीक्षक एकनाथ वाळके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे,पोलीस हवा. संदीप धुमाळ, ज्ञानेश्वर जाधव,पोलीस कॉं.सागर आरोटे आदी उपस्थित होते.

धनसंपदा पतसंस्था
धनसंपदा पतसंस्थेचे ध्वजारोहण संस्थेचे संचालक चंद्रकांत साईनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन अँड संजय दरेकर व्हा. चेअरमन दत्तात्रय सोमवंशी संचालक अविनाश दुसाने, सतिष सांगळे,संजय झाल्टे, संदीप शिरसाट,सुनिल कानडे आदी उपस्थित होते.
मातोश्री हौसाबाई दुसाने महिला पतसंस्था
मातोश्री हौसाबाई दुसाने महिला पतसंस्था व मातोश्री हौसाबाई दुसाने वाचनालयाचे ध्वजारोहण संस्थेच्या संचालिका योगिता गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या चेअरमन वैशाली दुसाने, व्हा. चेअरमन ज्योती शिरसाट संचालक गायत्री साईनकर, ज्योती कानडे, स्मिता खांदोडे, व्यवस्थापक ऋषीकेश जोशी, मनिषा वाडेकर, अमित नागरे आदी उपस्थित होते.

चंपालालजी भट्टड पतसंस्था
चंपालालजी भट्टड पतसंस्थेचे ध्वजारोहण अनिल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे चेअरमन निरज भट्टड, आरिफ मोमीन, राजाभाऊ दरेकर, शेखर लोळगे ,सुरज भट्टड, अनिल झडप, सुनिल बागले, अशोक भट्टड, योगेश कायस्थ, व्यवस्थापिका संगीता सोनवणे,रिकी खंडीझोड, अविनाश कदम, वसीम शेख, दिलीप बोथरा, जगन्नाथ जोशी,आदि उपस्थित होते
न्यू ब्लॉसम्स् इंग्लिश मिडीयम स्कूल
न्यू ब्लाँसम्स् इंग्लिश मिडीयम स्कूलचे ध्वजारोहण सुनिल कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय दरेकर, सचिव अविनाश दुसाने, संचालक सतिष सांगळे, चंद्रकांत साईनकर, संजय झाल्टे, संदिप शिरसाट प्राचार्या ज्योती माठा, मुख्याध्यापिका पुजा निकम, समन्वयक संगिता जगताप आदींसह विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे ध्वजारोहण स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष जगदीश जेऊघाले यांच्या हस्ते करण्यात आले.तर स्काऊट गाईडचे ध्वजारोहण पंढरीनाथ दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ सरपंच सचिन दरेकर स्थानिक स्कूल कमिटी सदस्य अनिल दरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गोरे, उपाध्यक्ष सोमनाथ निकम ग्रा.प. सदस्य संतोष जाधव, प्राचार्य नंदकुमार देवढे, पी. के. जेऊघाले, दिनकर चव्हाण, नानासाहेब गाडे, मिरा दरेकर, सोनाली कापडणीस, स्नेहल साळी, संतोष जाधव, स्वाती धात्रक, हरीष कांगणे, प्रविण ढवण,विनायक जेऊघाले, शंकरराव दरेकर ,फिरोज मोमीन, दरेकर सर, सतीश कुसळकर, डॉ. सौरभ शेंगणे, सतीश सोनवणे, बागुल सर, ज्ञानेश्वर सोनवणे, अशोक दरेकर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुरेश वाबळे, पर्यवेक्षक सुदाम माळी आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र चांदे यांनी केले.
