
सायखेडा (प्रतिनिधी). मंगळवार दिनांक२७/१/२०२६ रोजी सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समारोप समारंभ उत्साहात साजरा
भव्य ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडी आयोजन
सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजराभव्य ग्रंथप्रदर्शन व ग्रंथदिंडी आयोजन करण्यात आले.

कविद्या प्रसारक समाज संस्था संचलित सायखेडा येथील जनता इंग्लिश स्कूल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ विविध कार्यक्रमानी उत्साहात साजरा करण्यात आला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने विद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन व भव्य ग्रंथदिंडी पारंपारिक आणि उत्साही वातावरणात गावातून आयोजित करण्यात आली . व्यासपीठावर मविप्र निफाड तालुका संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय कारे, माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितिन गावले शालेय समितीचे सदस्य श्री दिलिप शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य रामदास वाजे,उपमुख्याध्यापिका श्रीमती अलका अहिरे ,पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार आदी मान्यवर उपस्थित होते. आकर्षक सजवलेल्या पालखीत भगवदगीता व इतर ग्रंथ ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ग्रंथपूजनाने झाली. विद्यालयतर्फे मान्यवरांचा गुलाबपुष्प व भगवद्गगिता देऊन सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करून ग्रंथांचा आस्वाद घेतला.

सर्व भाषेतील साहित्यिकांचे ग्रंथ, वाचनाची सवय लावणे ही नव्या पिढीची महत्त्वपूर्ण जबाबदारी असून पुस्तक आणि भाषा हेच खरे ज्ञानाचे दीपस्तंभ असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी आप्पा गडाख यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. ग्रंथदिंडीचे उद्घाटन संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख, शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजय कारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अवधूत आवारे यांनी केले.
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती प्राचार्य श्री रामदास वाजे यांनी आपल्या भाषणातून दिली. प्राचार्य श्री रामदास वाजे म्हणाले की, मराठी भाषा ही फक्त संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची,परंपरेची आणि ओळखीची मानबिंदू आहे. मराठी भाषेबद्दल अभिमान जागवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढवणे हा या पंधरवड्याचा मुख्य हेतू असल्याचे प्राचार्य रामदास वाजे यांनी स्पष्ट केले.
पंधरवडानिमित्ताने वाचनप्रेरणा उपक्रम,कविता वाचन,निबंधलेखन, शब्दसंपदा वाढवा अभियान, वाचनदिंडी, कथाकथन,सामान्यज्ञान स्पर्धा , वकृत्व स्पर्धा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मविप्र संचालक श्री शिवाजी आप्पा गडाख व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शब्दांकूर या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. उपमुख्याध्यापिका श्रीमती अलका अहिरे यांनी मराठी ही आपली मायबोली, संस्कृतीची शान आणि अभिमान असल्याचे सांगितले.पर्यवेक्षक श्री सोमनाथ पगार यांनी शुद्ध मराठीत बोलणे, लिहिणे ही आपली जबाबदारी आहे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा इतिहास,वैशिष्ट्ये आणि आजच्या काळातील महत्व याबाबत मनोगत व्यक्त केले. उपशिक्षिका श्रीमती मोरे मॅडम, श्रीमती भारस्कर मॅडम श्रीमती भालेराव मॅडम यांनी विविध कविता सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करून वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले .आई विषयी व इतर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल प्रेम, आदर आणि संवर्धनाची भावना वृद्धिंगत होण्यासाठी मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली शिंदे, पंकज गांगुर्डे यांनी केले तर आभार श्री विजय धनवटे यांनी मानले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सजून साहित्यिकांचे ग्रंथ, घोषवाक्यांचे फलक हातात घेत ग्रंथदिंडी सायखेडा गावात काढण्यात आली. ग्रंथपाल श्री भाऊसाहेब धनवटे व श्री विजय सोनवणे यांनी ग्रंथमांडणी केली. यावेळी विद्यालयाचे ढोलपथक व लेझिम पथक पुढे व मागे सर्व विद्यार्थी होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कर्पे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.
