
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६६ वा दिवस
तुम्ही पावित्र्य, नैतिकता, आणि भगवंतप्रेम हे आपले आदर्श कदापि खाली ओढू नका. तुमच्यावर वज्राघात झाला तरी तुम्ही भिऊ नका. उठा आणि कार्याला लागा आणि जोपर्यंत कार्यपूर्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका. जिथे प्रामाणिक धारणा आहे आणि जिथे विशुद्ध हेतू आहे तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोघांनी संपन्न असलेले लोक संख्येने थोडेसेच जरी असले तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील यात शंका नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास १० शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ३० जानेवारी २०२६
★ ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज जयंती
★ १९३३ जर्मनीचा हुकूमशाहा अॅडॉल्फ हिटलर याचा जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष (चॅन्सेलर) म्हणून शपथविधी झाला
★ १९४८ नथुराम गोडसेनी राष्ट्रपिता महात्मा गांधी ऊर्फ मोहनदास करमचंद गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली (पुण्यतिथी)
★ हुतात्मा दिन…
★ बापूजींच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.
