
ओझर: ( वार्ताहर)महाराष्ट्राचे शिस्तप्रिय कणखर निर्भीड सर्वांना परिचित असलेले व्यक्तिमत्व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्याची राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार चळवळीची मोठी हानी झाली या शब्दात शालेय समितीचे अध्यक्ष भास्करराव शिंदे यांनी ओझरच्या बोरस्ते विद्यालयात आयोजित शोक सभेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापनचे अध्यक्ष प्रकाश महाले मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करून मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सदस्य जंगल पगार निवृत्ती शेटे पुंडलिक गवळी आदी सदस्य, अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते. विद्यालयाच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली….
निशब्द
