
लेखक प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे दुःखद निधन अतिशय दुर्दैवी घटना असून भूतो न भविष्यते अशी ही घटना घडली. अजित दादांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राने एक उदात्त विचारांचा नेताच नव्हे तर प्रकल्प राजकीय नेता गमावला.
एखादया राजकारणी व्यक्तीपेक्षा कुणाच्या तरी घरचा आधारस्तंभ गमावणे ही खूप दुर्दैवी बाब आहे. मा. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली, मुत्सद्दी नेतृत्व होते. त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री पद सांभाळले होते, तसेच विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळून महाराष्ट्र राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले होते. शेतकरी, ग्रामीण विकास, सिंचन आणि पायाभूत सुविधा यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले होते व त्या क्षेत्रात आपल्या नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नव्हे, तर
कार्यक्षम प्रशासक, ठाम निर्णयक्षमता असलेला नेता, बेधडक व स्पष्ट वक्तेपणाचा आवाज म्हणूनही होती.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. आज महाराष्ट्राने एक तरुण आणि उमदा नेता गमावला आहे.
बारामती इथं झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं आहे. विमान लँड होत असताना झालेल्या या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वांनाच धक्का बसला आहे.. दिवसभरात त्यांच्या चार सभा होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांची धावपळ सुरू होती. महानगरपालिका निवडणुकीतही त्यांनी मोठी धावपळ केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सुमारे ७ वाजता आपल्या सुरक्षा पथकासह आणि कर्मचाऱ्यांसोबत ८ आसनी चार्टर्ड विमानाने मुंबईहून रवाना झाले होते. हे विमान बारामतीकडे येत होते. या विमानात अजितदादा, त्यांचे दोन सहाय्यक, दोन पायलट आणि इतर दोघे होते. हे विमान कोसळल्यानंतर एकामागून एक स्फोट ऐकू आले आणि होत्याचे नव्हते झाले.
अजित दादा यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राने एक उदात्त विचारांचा नेता गमावला.अजितदादा हे कामासाठी वाघ माणूस मानल्या जायचे. भल्या पहाटे उठून ते कामाला सुरुवात करायचे. सकाळीच एखाद्या बसस्थानकाला, उद्यानाला अथवा सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन तिथली व्यवस्था ते पाहात आणि प्रशासनाला योग्य निर्देश देत. त्यामुळे प्रशासनात त्यांचा आदरयुक्त धाक होता. पण आज अचानक आलेल्या या वाईट बातमीने प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांना दुःख आवरता आले नाही.
अजित दादा म्हणजे स्पष्ट बोलणारा नेता, अजिद दादा म्हणजे उदात्त विचार करणारे,अजितदादा म्हणजे एक स्पष्टवक्तेपणा… , अजितदादा म्हणजे एक करारी नजर… ‘अजितदादा’ म्हणजे कडक शिस्त व स्वभाव…. आणि अजितदादा म्हणजेच कोणतेही हाती घेतलेले काम होणार असेल तर हो म्हणणारे आणि काम होणार नसेल तर नाही म्हणणारे, दादाच सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतात.
कोणतेही वक्तव्य करताना ते रोखठोक व परखड बोलणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती.
अजित पवार यांचं नाव निघताच, डोळ्यासमोर उभी राहते ते मीडियापासून अंतर राखून असणाऱ्या आणि बोलण्यापेक्षा कृतीत जास्त रस असणाऱ्या नेत्याची प्रतिमा. त्यामुळे अजित पवार जाहीर सभांमधील भाषणं सोडली तर सोशल मीडियावर प्रसारमाध्यमांशी फारसा संवाद साधताना दिसत नव्हते. इतकंच काय अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलताना मोजकंच बोलायचे. एखाद्या आरोपावर किंवा टीकेवर उत्तर देण्यासाठी प्रसारमाध्यमांशी बोलणे वेगळे. पण एरवी अजित पवार हे स्वत:हून आपल्या निर्णयांची किंवा कामांची जाहिरात करताना फारसे दिसत नव्हते.
दादाची कारकिर्द सुरू झाली ते सहकारी क्षेत्रातून. त्यातूनच ते राजकारणात आले. १९८२ मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले, ही त्यांची राजकीय कारकीर्दीची सुरुवात होती.
१९९१: बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. पण नंतर जागा शरद पवार यांच्यासाठी सोडली.त्याच वर्षी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झाले (१६ वर्षे पद भूषवले).
१९९० च्या दशकात: राज्य मंत्रिमंडळात कृषी, जलसंधारण, ऊर्जा, नियोजन अशा खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले.
२००४ पासून: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे प्रमुख नेते म्हणून उदयास आले.उपमुख्यमंत्री पद: अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अनेकदा (किमान ५-६ वेळा) शपथ घेतली आहे. हा एक विक्रम मानला जातो.२०१०-२०१४: प्रथमकाळ उपमुख्यमंत्री (काँग्रेस-NCP सरकार).
२०१९: फक्त ८० तास उपमुख्यमंत्री (शिवसेना-NCP-काँग्रेस
दादा वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होते.जलसंसाधन, सिंचन, ग्रामीण विकास, वित्त आणि नियोजन खात्यांवर काम केले.
ते “दादा” म्हणून ओळख होतीआणि जनता दरबारद्वारे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिद्ध होते. विकासकामांसाठी १६-१७ तास काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्र, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पाणी व्यवस्थापनात त्यांचा मोठा प्रभाव राहिला.
राज्याच्या राजकारणातील एक प्रगल्भ राजकीय नेता म्हणून त्यांची ख्याती होती मात्र सिंचन घोटाळा (Irrigation Scam) प्रकरणात नाव जोडले गेले, ज्यात विजय पंधारे यांनी आरोप केले होते. मात्र, हे आरोप सिद्ध झाले नाहीत.- २०१३ मध्ये दुष्काळावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले होते, ज्याची नंतर माफी मागितली.२०१९ मध्ये NCP-शिवसेना-काँग्रेस आघाडी तोडण्याचा प्रयत्न केला होता.नुकत्याचे घडामोडी (२०२५-२०२६ पर्यंत)२०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी NCP फोडून महायुतीत (BJP-Shiv Sena) सामील झाले.२०२४-२०२५ मध्ये उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून काम केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये (२०२५) त्यांच्या NCP ने पुणे भागात चांगली कामगिरी केली, पण काही ठिकाणी BJP ने मागे टाकले.
BMC आणि इतर महानगरपालिका निवडणुकीसाठी (२०२६) तयारी सुरू आहे.
दुर्दैवाने २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द अचानक संपुष्टात आली. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व असे त्यांचे योगदान राहिले.
९५६१५९४३०६
