

सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६५ वा दिवस
जगातल्या कोणत्याही देशाहून भारतातील संस्थांची ध्येये व उद्दिष्टे ही अधिक उच्च आहेत. हे शूर वीरा ! धीट हो, धैर्य सोडू नकोस, तू भारतवासी आहेस याबाबत गर्व वाटू दे. अभिमानाने उच्च स्वरात ललकारी दे की, मी भारतीय आहे. प्रत्येक भारतीय माझे बांधव आहेत. जगाला गर्जून सांगा की, अज्ञ भारतवासी, गरीब भारतवासी, दुःखी भारतवासी. हे गौरीनाथा ! हे माते ! हे जगदंबे ! मला मनुष्यत्व दे. भारताच्या पुनरुत्थानासाठी मला शक्ती दे, सामर्थ्य दे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ९ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २९ जानेवारी २०२६
★ जया एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ भीष्म द्वादशी
★ १९२२ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रा. राजेंद्र सिंग उर्फ रज्जू भैय्या यांचा जन्मदिन
★ १९७० ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राजवर्धनसिंग राठोड यांचा जन्मदिन
★ १९९३ गणितज्ञ रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय यांचा स्मृतीदिन.
