
मोरेवाडी ( प्रतिनिधी). १५ व्या”वित्त आयोगातून ग्रामपंचायत कासारी मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडीस पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.शाळेची स्थापना सन २००५ साली झालेली असून शाळेत अद्यापपावेतो पाण्याची पर्यायी व्यवस्था ही ज्यांनी शाळेसाठी जागा दान दिली असे दानशूर व्यक्तिमत्व शाळेचे स्वयंपाकी जिभाऊ मोरे यांच्यामार्फत करण्यात येत होती.सन २०१९ पासून शाळेच्या मुख्याध्यापकपदी गणेश बागुल सर यांनी कार्यभार स्वीकारला.त्यांनी पंतप्रधान जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याचे पाणी शाळेत उपलब्ध करून देण्याबाबत सतत पाठपुरावा करून स्मरणपत्र ग्रामपंचायतीस दिले व आज दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी सदरचे पिण्याच्या पाण्याचे स्वप्न ग्रामपंचायत “१५ व्या”वित्त आयोगाच्या निधीतून कायमस्वरूपी साकार झाले.

याकामी विद्यमान सरपंच काशिनाथनाना काळे,सदस्य नितीनभाऊ शेरेकर,ग्रामसेवक सतीश काकळीज,लिपिक उमेश पाटील,ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी व सदस्य,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुकाराम मोरे,माजी अध्यक्ष कैलास विश्वनाथ मोरे,सर्व सदस्य,पालक काभू रतन मोरे,काळू कान्हा मोरे,सदाशिव समाधान मोरे, मनोहर महादू कर्नर,ग्रामस्थ भाऊसाहेब सखाराम मोरे,विश्वास बारवकर मिस्तरी,रामदास भिमा मोरे,सुनील बाळू मोरे,गोकुळ कंकर माळी,बाळू लहू मोरे स्वयंपाकी जिभाऊ मोरे,स्वयंसेवक ज्ञानेश्वर रुपचंद सोनवणे,रवींद्र सुखदेव मोरे,गणेश गोकुळ माळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
