
🌄🕉️✍️॥ अंतर्नाद॥🌄📚✒️
📚॥आठवणीतील कुसुमाग्रज॥📕 📘अक्षरदस्तऐवज 📗
🌄ज्ञानपीठाच्या अक्षरप्रभा 🌄
साप्ताहिक कुसुमाग्रज नगर
संपादक👑🔥
🙏रामदास नागवंशी.👏
संपर्क _ ( ९२२५९२२५२० )
सर्वात्मका शिवसुंदरा
स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे
प्रभू आमच्या ने जीवना …
साहित्य पंढरीचे पांडुरंग कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या ११३ व्या जयंती वर्षा प्रीत्यर्थ [ आठवणीतील कुसुमाग्रज ]हा अक्षरग्रंथ आपल्या भेटीला आला आहे . साप्ताहिक कुसुमाग्रज नगरचे संपादक श्रीमान रामदास नागवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी माऊली मायमराठीच्या विश्वमंदिरातील अक्षरयोगी कुसुमाग्रजांच्या जीवनातील अमृतस्मृतीशलाकांचा दस्तऐवज आविष्कृत केला आहे .
[ रविवार ११ जानेवारी २०२६ रोजी परशुराम सायखेडकर नाटयगृह , सार्वजनिक वाचनालय , श्रीक्षेत्र नाशिक येथे एका हृदयंगम समारंभात या अक्षरग्रंथाचे प्रकाशनाचा दिमाखदार सोहळा संपन्न झाला .
ख्यातनाम गायिका , स्वरचंद्रिका
पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्याहस्ते प्रकाशन झाले . अध्यक्षस्थानी विद्वान व अक्षरतपस्वी प्राचार्य डॉ . दिलिपजी धोंडगे व विशेष अतिथी म्हणून श्रीक्षेत्र नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाचे शिल्पकार एक समर्थ पोलीस आयुक्त श्रीमान संदिपजी कर्णिक उपस्थित होते .
२०० पानी सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार कागदावर जवळ जवळ ५६ लेखकांच्या हृदयंगम आणि अविस्मरणीय आठवणी शब्दांकित झाल्या आहेत .वि .स . खांडेकरांच्या अर्ध्यदानसह संपादकीयही अत्यंत प्रेरणाप्रवर्तक साकारले आहे .
डोळ्यात कशाला पाणी या पद्मजा फेणाणी जोगळेकरांच्या पहिल्या लेखातील अंतर्मुख करणारं अक्षरधन अंतरंगात कुसुमाग्रजी तेज आणि सुगंधाची अनुभूती घडवतं . या महाकवीने चिरंतन ,अक्षर प्रेरणांचं गाठोडं नव्या पिढयांसाठी निर्माण करून ठेवलंय . रामदास नागवंशी , प्र . द . कुलकर्णी , पद्माकर देशपांडे , डॉ . मुक्तेश्वर मुनशेट्टीवार , प्रवीण जोशी , उद्योजक गोविंद झा , सल्लागार प्रशांत शिवरामे व त्यांच्या सहयोगी आणि हितचिंतकांनी अद्भूत कामगिरी केली आहे . माझे प्रेरणास्थान _ पंडित सोनवणी , तात्यासाहेबांची खोली _ रेखा भांडारे , कुसुमाग्रजा : मानवतेचे निशाण _ प्रा .प्र.दा . कुलकर्णी , तात्यासाहेबांना आठवताना ! डॉ . दिलीप धोंडगे , गोदाकाठी रेशिमगाठी _ डॉ . आशुतोष रारावीकर , ज्ञानतपस्वी कुसुमाग्रजांच्या आठवणी _ वसंतराव खैरनार , बजावली कार्यकर्त्याची भूमिका _ जयप्रकाश जातेगांवकर , व्यासंगी रसिक तात्यासाहेब _ संजय देवधर , आंतरजातीय विवाहाला आशीर्वाद _ रमेश देशमुख , कुसुमाग्रजांच्या सहवासात _ उत्तम कोळगावकर , भेटीलागी जीवा लागलिसे आस विजयकुमार मिठे , गोदेच्या प्रवाहातील समतेचा ज्ञानदीप डॉ . मुक्तेश्वर मुनशेट्टीवार , तात्यासाहेब देवदेणे _ प्रमोद तेंब्रे , एक उर्जस्वल , स्फटिक शुभ्र अभिव्यक्ती _ अलका कुलकर्णी , एका तेजस्वी व्यक्तिमत्वाचा प्रभाव _ विश्वास ठाकूर , क्षितीजावरील अढळ तारा _ पद्माकर देशपांडे , कुसुमाग्रजांच्या समृध्द आठवणी _ बी .जी . वाघ , आठवणी तात्यासाहेबांच्या ! _ देवचंद पाटील महाले , शब्दांच्या ओंजळीतली कुसुमांजली _ लक्ष्मीकांत जोशी , आणि मीही ज्ञानपीठाने पावन झालो _ सतीश बोरा , सामाजिक कार्यकर्ता असलेला साहित्यिक _ सुभाष सबनीस , कुसुमाग्रजांचे अमर अस्तित्व _ अलका दराडे , आठवणीतील तात्यासाहेब _ डॉ . प्रकाश बर्वे , स्नेह स्नेहवर्धिनीतला _ डॉ . जयश्री पाटील , कुसुमाग्रज व दादासाहेब गायकवाड स्नेह _ शशांक हिरे , आत्मियता निर्माण करणारा अवलिया _ प्रवीण जोशी , कुसुमाग्रज , एक खरा माणूस ! _ मुकुंद दीक्षित , त्या भेटीचे कायम स्मरण _ डॉ . प्रशांत भरवीरकर , साहित्यातील देदिप्यमान तारा _ सोमनाथ पवार , तात्यासाहेब , एक संवेदनशील माणूस _ पद्माकर पुंडे , गोदामाईचे पाणी टचकन डोळ्यात उतरते _ मिलींद गांधी , साहित्य पंढरीचा पांडुरंग _ सावळीराम तिदमे , लोक हितवादी तात्यासाहेब _ प्रा . दिलीप फडके , वैनतेयने केले गगन ठेंगणे _ अनिल वांजपे , स्वर्गदारातील तारा _ सदानंद भणगे , मराठीचा डंका चोहीकडे ( कविता ) _ मकरंद फडके , पाठीवरील शाबासकीची ऊब आजही कायम _ प्रा . अशोक सोनवणे , माय मराठी अभिजात जाहली _ डॉ .सौ .मेघा जंगम , शब्दप्रभू _ प्रसाद ताम्हनकर , योग हरिहर भेटीचा _ विलास पंचभाई , तात्यासाहेबांचा आशीर्वाद मिळाला _ रमाकांत देशपांडे , रांगोळीतून तात्यासाहेबांना अभिवादन _ नीलेश देशपांडे , भेट कवितेच्या देवाची _ प्रा .सौ . सुमती पवार , कुसुमाग्रज एक परिसस्पर्श पुंजाजी मालुंजकर , तात्यासाहेबांची अमृतवाणी प्रदीप गुजराथी , मराठी साहित्यविश्वातील एक दीपस्तंभ , कुसुमाग्रज _ वर्षा शेटे -ननवरे , युगंधराला लाभला कुसुमाग्रजांचा आशीर्वाद _ प्रा . सुरेश नारायणे , मला भावलेले कुसुमाग्रज _ अलका कोठावदे , साहित्यसूर्य कुसुमाग्रज _ सौ . आशा गोवर्धने , माझ्यासाठी कुसुमाग्रज आशीर्वाद ते पुरस्कार _ प्रा . सय्यद अल्लाउद्दीन , तात्यासाहेब नाशिकचे वैभव _ प्रा . मिलिंद चिंधडे , संस्कृत कार्यासाठी आशीर्वाद _ सरिता रमेश देशमुख , सप्रेम _ नितीन म . बुधले , परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी _ राजीव पटेल , मी पाहिलेले तात्यासाहेब _ संजय आहेर . कवीवर्य कुसुमाग्रजांच्या
उठा उठा चिऊताई , मौन , देवाचं काही अडत नाही , तळघर , समिधाच सख्या या , कणा , दूर मनोऱ्यात , स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या , सागर , अनंत , प्रेम कर भिल्लासारखं , कोलंबसचं गर्वगीत , क्रांतीचा जयजयकार , गाभारा या कवितांचा समावेश असलेला हा अक्षरग्रंथ म्हणजे संदर्भग्रंथासारखा दस्तऐवज बनला आहे . प्रत्येक मराठी माणूस कुटुंब , संस्था , संघटना , वाचनालय , शाळा , महाविद्यालय , विद्यापीठे , संदर्भ ग्रंथालये , विदेशातील मराठी मंडळे , साहित्यिक संस्था , जिज्ञासू , रसिक यांनी हा ग्रंथ वाचून संग्रही ठेवावा इतका तो सर्वस्पर्शी व सर्वानंदी झाला आहे . कुसुमाग्रजांबद्दल असलेली आत्मियता , कृतज्ञता व हृदयस्थ भक्तिभाव म्हणजे हे अक्षरपुष्प आहे . दीपक दंडवते यांची सुरेख अंतर्गत सजावट , विष्णूजी थोरे यांचे अप्रतिम मुखपृष्ट , रिप्लिका प्रिंटर्सची सुंदर कामगिरी वाचकाला पुलकित करते .
सत्तरी गाठलेला चैतन्याचा स्रोत म्हणजे संपादक रामदास नागवंशी . अडचणी , अडथळे , संकटे , प्रतिकूलता व आर्थिक संकटांवर स्वार होऊन , जिवाभावाची माणसं जोडून जिद्द, चिकाटी , सच्चाई व अच्छाईच्या भांडवलावर समर्थपणे लढतोय .सत्कर्म करण्यासाठी पत्रकारिता धर्मासाठी . या व्रतस्थ , लढवय्या पत्रकाराचे आत्मानंदी अभिनंदन . या माणसाच्या अक्षरकार्यकर्तृत्वाला त्रिवार वंदन . खरोखर हा ग्रंथ म्हणजे कुसुमाग्रजांच्या अक्षरकार्यातील मौल्यवान माणिकमोती आणि हिरे आहेत . साहित्य साधक , उपासक , पूजक , रसिक , जिज्ञासू यांच्यासाठी हा ग्रंथ म्हणजे अक्षरप्रकाश आहे . माऊली माय मराठीच्या साहित्यविश्वातील एक अनमोल रत्न म्हणजे ( कुसुमाग्रजांच्या आठवणी ) हा ग्रंथ . ग्रंथनिर्मितीसाठी संपादक रामदास नागवंशी यांनी प्रयत्नांची सर्वात्मक उंची गाठली आहे . त्याचा प्रसाद म्हणून हा ग्रंथ इतका अप्रतिम , सर्वांगसुंदर , सर्वस्पर्शी व उपयुक्त झाला आहे की कुसुमाग्रजांनी स्वर्गातून आशीर्वाद दिले . माऊली माय मराठी सुद्धा या ग्रंथामुळे प्रसन्न झाली . अक्षरोपासक , साहित्यभक्त , कुसुमाग्रजांच्या चरणी समर्पित संपादक रामदास नागवंशी यांच्या या ग्रंथनिर्मिती यज्ञाला या सम हा अशीच उपमा द्यावी लागेल .
५०० रूपये इतकी माफक किंमत असलेला अक्षररत्न स्वरूप ग्रंथ प्रत्येक मराठी माणसाने , कुटुंबाने , समुहाने , संस्थेने , संघटनेने खरेदी करून वाचायलाच हवा . त्यावर चिंतन , मंथन , समीक्षा , लेखन करायला हवे . ज्यांना साहित्यिक बनायचं आहे , ज्यांना साहित्याचे अंतरंग समजून घ्यायचे आहेत , ज्यांना कुसुमाग्रज समजून घ्यायचे आहेत , ज्यांना साहित्यासह कुसुमाग्रजांवर पीएचडी करायची आहे अशा प्रत्येकाने हा ग्रंथ खरेदी करायलाच हवा . या ग्रंथाच्या पानापानातून साक्षात् तात्यासाहेब आपल्याशी सुसंवाद करतात . मग काय बोला संपादक नागवंशी सरांशी कुसुमाग्रजांच्या आठवणी ग्रंथ खरेदीसाठी .👏🌄🙏📚📕📘
सावळीराम तिदमे .
८००७९७५७६० .
