संजीवनी प्राथमिक विद्यामंदिरात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठा उत्सवात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. सुनील हिरे तसेच अधिक्षिका सौ. अरुणा चोथवे ज्येष्ठ शिक्षिका सौ. वंदना शहारे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. अश्विनी सगर व श्री.सतीश भडांगे उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगला गोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,तसेच मान्यवरांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव ठेवा आणि साक्षर भारत बनवा त्यासाठी मुख्याध्यापिका यांनी सहा यशस्वी मूल्य सांगितले पुनम खैरनार यांनी साक्षर भारताची प्रतिज्ञा घेतली रूपाली गवळी यांनी संविधान वाचन केले.तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. देशभक्तीपर गीतावर सादर केलेले रंगीत कवायत शाळेची शिस्त दाखवत होती कब बुलबुल च्या
मुलांनी सुंदर असे संचलन करून ध्वजाला सलामी दिली. दर तीन महिन्यांनी प्रकाशित होणारे ज्ञानयात्री पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचा हस्ते करण्यात आले. तसेच शाळेत मुलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिक्षकांच्या गुणवंत पाल्यांनाही बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम खैरनार व रुपाली गवळी यांनी केले. श्री. महेश गुंजाळ यांनी जोरदार घोषणा दिल्या कार्यक्रमाला सर्व व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतल