
जळगाव खु! ( प्रतिनिधी ) गायत्री इंग्लिश मिडीयम स्कुल जळगाव खुर्द विद्यालयात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी शाळेचे ध्वजारोहण सैन्यदलातील गोटीराम कट्यारे , विनोद सरोदे , चंद्रपाल सरोदे, व प्रमुख पाहुणे दर्शन अनिलकुमार आहेर , (सभापती कृ ऊ बाजार समिती नांदगाव ), निंबाभाऊ सरोदे यांच्या शुभ हस्ते ध्वज पुजन करून ध्वजंवंदन करण्यात आले .

या याप्रसंगी चिमुकल्या मुलांनी संगीत कवायतीचे संचलन करण्यात आले तसेच साक्षरतेची शपथ घेण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थित वार्षिक क्रिडा स्पर्धेमधील उत्तीर्ण विद्यार्थांना विविध बक्षिस व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले विद्यार्थांनी विविध देश भक्तीपर गितांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्य सौ . वैशाली गाडेकर , जोंधळे के . एस , मोरे पी .आर , जोंधळे टी एस, सरोदे पी . एस, आर्यन जोंधळे सुत्रसंचलन मोरे सोनाली यांनी केले . व आभार गाडेकर सर यांनी मानले याप्रसंगी सर्व पालकवर्ग व महिला पालक यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् याने होऊन मुलांना खाऊ वाटप करण्यात आला .
