
नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते जेष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान
नांदगाव ( प्रतिनिधी) नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन आणि २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.नांदगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे आणि उपनगराध्यक्ष राजेश शिंदे,शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव,रिपाईचे शहराध्यक्ष महावीर जाधव, जेष्ठ पत्रकार संजीव निकम,मारुती जगधने,सुरेश शेळके,संजय मोरे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरजमल संत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.प्रथमतः खरा तो एकची धर्म…जगाला प्रेम अर्पावे…या प्रार्थनेने सुरवात करत
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.२६ जानेवारी रोजी देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असतानाच, पत्रकार दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाने हा स्तुत्य उपक्रम राबवला. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा आदर करणे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे,समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान मोलाचे असते, याच भावनेतून पत्रकार संघाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमावेळी जेष्ठ नागरिक भावनिक झाल्याचे दिसून आले,
या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे,उपनगराध्यक्ष राजेश शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते समाजातील अनुभवी आणि मार्गदर्शक ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सन्मानचिन्ह, शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांनी पत्रकार संघाच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. पत्रकारिता केवळ बातम्या देण्यापुरती मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघ करत आहे, ही भूषणावह बाब आहे, असे त्यांनी या वेळी नमूद करत उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्यात, जेष्ठ पत्रकार मारुती जगधने यांनी जेष्ठ नागरिकांच्या जीवनावर सुंदर काव्य सादर करत ज्येष्ठाणच्या संघर्षाला नतमस्तक होणे हाच खरा मान असल्याचे सांगितले.
या सोहळ्याला जेष्ठ नागरिक,यांच्या सह,पत्रकार नाना आहिरे,प्रज्ञानंद जाधव,अफरोज अत्तार,किरण भालेकर, राजेंद्र जाधव,विजय बडोदे,अनिस शेख,निखिल मोरे,खुशाल थोरात,स्वप्नील धनवटे,रितेश पगारे,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनी मिळालेल्या या सन्मानामुळे ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले,या वेळी जेष्ठ नागरिक संघाचे कुदरत अली शहा,श्रावण आढाव,भिका पाठक,शिवाजी निकम,रमाकांत सोनवणे,शानु बडोदे,यांच्या सह मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नाना आहिरे यांनी केले,तर निकम सर यांनी आभार मानले असून या कार्यक्रमाला संतोष पारवे,मनोज पारवे यांनी परिश्रम घेतले.
