
नाशिक ( प्रतिनिधी)नाशिक दिनांक २६ जानेवारी : नाशिकच्या महात्मा गांधी रोड येथील ११० वर्षांमध्ये पदार्पण करणाऱ्या श्री. यशवंत व्यायाम शाळा या संस्थेच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ, खजिनदार विजय खरोटे, कार्यकारी सदस्य डॉ. जयराम महाबळ, डॉ. सदाशिव गोसावी, प्रशांत गायकवाड, आनंद खरे, उमेश राठी तसेच सर्व जेष्ठ सभासद, महिला सभासद, प्रशिक्षक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रघुनाथ महाबळ यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी संस्थेचे सभासद, हितचिंतक यांनी संस्थेच्या आणखी चांगल्या प्रगतीसाठी स्वयंस्पुर्थीने भरघोष देणगी दिली. यामध्ये राजेबहाद्दर यांच्यातर्फे पाच लाख रुपये, रामबंधू मसाल्याचे संचालक आणि व्यायामशाळेचे जेष्ठ सभासद उमेश राठी यांच्याकडून एक लाख रुपये, जेष्ठ सभासद श्रीमती डॉ. प्रतिभा धोपावकर यांच्या कडून एक लाख रुपये, जेष्ठ सभासद अरुण पळसकर यांच्या कडून पाच हजार रुपये संस्थेला देणगी देण्यात आली.
याआधी मागील महिन्यात वैदयकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर प्रकाश जोशी आणि डॉ. ललिता जोशी यांच्या वतीने दहा लाख रुपये आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा व्यायाम शाळेचे जेष्ठ बलोपासक रमेश देशमुख यांच्या तर्फे पंचवीस हजार रुपये देणगी देण्यात आली होती.
श्री यशवंत व्यायाम शाळा ही संस्था ३१ मार्च, २०२६ रोजी ११० वर्षांमध्ये पदार्पण करणार आहे. नाशिकच्या नागरिकांचे आणि यशवंत व्यायाम शाळा यांचे अतूट नाते आहे. त्यामुळे या संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी सर्व जेष्ठ सभासद, हितचिंतक नागरिक अश्या प्रकारे आर्थिक सहकार्य करून मोलाचे योगदान देत आहेत याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील आणि उपाध्यक्ष रघुनाथ महाबळ यांनी ऋण व्यक्त केले.
.
