
क्रांतीवीर वसंतराव नाईक प्राथमिक विद्यामंदीर, नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. ११, बुधलवाडी मनमाड येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ठीक ७:३० वाजता भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन करण्यात आली. त्यानंतर प्रभागातील सन्माननीय नगरसेविका मा. सौ. कमलताई वाल्मिक (आप्पा) आंधळे व मा. सौ. रेशमाताई रत्नदीप पगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीताच्या सुरावटीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थी सिध्दी देवकाते, हर्ष शिंदे, कल्याणी गंभिरे यांनी विविध देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. काव्या घुगे, निल गांगुर्डे, सिध्दी देवकाते, कल्याणी गंभिरे, मंथन घुगरे, अमृता राम, दावल बारे, ईश्वरी कांदे, निधी राम, समृध्दी उबाळे, पूर्वा एळिंजे, प्रणाली सांगळे, प्रणव गंभिरे या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, स्त्री शक्तीचे योगदान, स्वच्छ भारत यावर आपली मते मांडली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातुन, संविधानाने दिलेल्या हक्कांसोबतच आपण आपल्या कर्तव्यांचे पालन करणे हीच खरी देशसेवा आहे. असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. वाल्मिक आप्पा आंधळे, मा. श्री. रत्नदीप पगारे, मा. श्री. अशोक सानप यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रभागाच्या नगरसेविका मा. सौ. रेशमाताई पगारे यांनी प्रजासत्ताक दिनाविषयी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच प्रभागाच्या नगरसेविका मा. सौ. कमलताई वाल्मिक आंधळे यानी प्रजासत्ताक दिनाविषयी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना शुभेच्या दिल्या व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मा. श्री. वाल्मिक आप्पा आंधळे यांच्या तर्फे खाऊचे व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मा. श्री. रत्नदीप पगारे यांनी डायमंड ग्रुपतर्फे भाषणे व नृत्य सादर करण्याऱ्या मुलांना रोख बक्षिसे जाहीर केले.
याप्रसंगी बुधलवाडी येथील श्री. अशोक सानप, श्री. हरीष सांगळे, श्री. अशोक सांगळे, श्री. विनोद सांगळे, श्री. सुनिल साताळे, श्री. उगले सर, श्री. प्रमोद केकाण, श्री. सागर शिंदे, श्री. तुषार बोडखे, श्री. योगेश सानप, श्री. गंगाधर उबाळे, श्री. माणिक दरगुडे, श्री. कमलाकर निरभवणे, सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती विजया चकोर मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक श्री. वसंत माळी सर इ. मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना साखरे मॅडम व शिक्षक श्री. ओम गोखले तसेच अंगणवाडी सेविका दयाश्री काळे, कविता कदम, वंदना नारखेडे संगिता काळे, रंजना चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री. नितीन कोल्हे यांनी केले.
