
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६३ वा दिवस
आपले एकमेव उपास्य दैवत म्हणजे आपले राष्ट्र होय. त्याची सतत आराधना करा, ते जागृत आहे, सर्वत्र व्याप्त आहे, त्याचेच चरण, त्याचेच पूजन, त्याचेच कथन, त्याचेच श्रवण सातत्याने करा. त्या विराटचे दर्शन सर्वत्र होत असताना अन्य देवतांची व्यर्थ आराधना कशासाठी? या एकमेव उपास्य दैवताची उपासना आपल्या हातून घडू द्या. त्यातूनच इतर दैवतांची उपासना आपोआपच घडेल.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ७ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६
★ १८५० आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचा सुकाणुधारी (कॅप्टन) एडवर्ड जे. स्मिथ यांचा जन्मदिन
★ १९०१ महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा जन्मदिन
★ १९२६ भारताचे १३ वे लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्मदिन
★ १९४७ रोटरी क्लबचे संस्थापक पाॅल हॅरिस यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
