
मनमाड ( प्रतिनिधी ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मनमाड आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल, मनमाड आणि अभिनव बाल विकास मंदिर, मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाचे ध्वजारोहण भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक श्री. राजेंद्र देशमुख व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व माजी नगरसेवक श्री. रवींद्र घोडेस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री बाळासाहेब साळुंखे हे होते.

ध्वजाचे ध्वजारोहण करून राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली भाषणे केली तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. शंकरराव बोडके, श्री. सुनील गवांदे, श्री. विजय दरगुडे, श्री. मनीष काकळीज, श्री. प्रकाश काळे, श्री. हिरामण कुसमाडे, श्री. सुनील साळवे, श्री. सिद्धार्थ संसारे, ॲड. वाल्मीक जगताप, श्री. आप्पासाहेब आहेर, किरण रामटेके मॅडम, अफरोश मॅडम, मुमताज अब्बास मॅडम, श्री. भगिनाथ घुगे, श्री. अशोक व्यवहारे, श्री. छगन (पिंटू) मेंगाणे, पालक, विद्यार्थी व ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुप्रिया घोरपडे मॅडम व संपदा येणारे मॅडम यांनी केले तर आभार आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्या श्रीमती शीतल आहेर मॅडम यांनी मानले. चित्रकला स्पर्धेत 100% निकाल लागला असून मुख्याध्यापक वाघ सर व कला शिक्षक श्री. कदम सर यांचे व सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन करून प्रमाणपत्र वितरण केले.
