
नांदगाव (वार्ताहार ) दि. २६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित वैजनाथ जिजाजी (तांत्रिक) विद्यालयात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची सुरुवात संविधानाच्या उद्देशीकेच्या वाचनाने झाली. सेवानिवृत्त होणारे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. गुलाब मोरे ,मा. मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे व शालेय समिती अध्यक्ष मा. संजीवजी धामणे आणि अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहन होऊन उपस्थित सर्वांतर्फे तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी मोठ्या जोशासह तालासुरात म्हटलेल्या राष्ट्रगीत, महाराष्ट्र राज्यगीत आणि ध्वजगीताने शाळेतील एकूणच वातावरण देशभक्तीमय झाले नसते तर नवलंच ..!!* व्यासपीठावर प्रमुख पाहूणे भारतीय सैन्यदलात आसाम येथे कार्यरत असलेले सैनिक श्री. गोविंद सदगीर , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संजीवजी धामणे मा. मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत ठाकरे , उपमुख्याध्यापक डॉ. श्री. नांदुरकर , माजी NCC शिक्षक श्री. साळुंके,ज्येष्ठ शिक्षक श्री. गुलाब मोरे ,पा. शि. संघ सदस्य श्रीमती पूनम लोहाडे, श्री. अनिल थोरे, श्रीमती प्राची सानप, श्रीमती कुंभार्डे, श्रीमती कुमावत तसेच टी. एम. बोर्ड सदस्य गुलाब पाटील, भास्कर मधे, श्रीम रुपाली झोडगेकर , उपस्थित होते सर्व मान्यवरांसह उपस्थित विद्यार्थ्यांनी ध्वज प्रतिज्ञा म्हणत संकल्पपूर्वक निर्धाराचे स्मरणही केले.

मान्यवरांच्या शुभहस्ते भारतमाता प्रतिमेस पुष्प अर्पण करत भारतमातेचे पूजन करण्यात आले.
मा.श्री. लक्ष्मीकांत ठाकरे ह्यांनी आपल्या संदेशातून सर्वप्रथम ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. भारत देशाने संविधानाची अमलबजावणी झाल्यापासून ७७ वर्षाच्या कालावधीत केलेल्या सर्व क्षेञांतील सर्वंकष प्रगतीला सर्वांसमोर उजाळा देतांना आदर्श संविधान निर्माण कर्त्यांचे ऋण व्यक्त केले. उदिष्ट्ये साध्य करण्यासाठी शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम यांचा अंगीकार करत अधिकारांचा उपभोग घेत असताना तितक्याच तत्परतेने कर्तव्य पार पाडत आदर्श नागरिक बनवूया आणि २०४७ च्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवोत्तर भारत हा सदृढ, सक्षम व सशक्त बनविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. यासाठी जबादार नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांनी करावे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या प्रस्ताविकेतून उपस्थितांना केले. विद्यालयातील NCC पथकाने मेजर श्री. राजेश भामरे ह्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रध्वजाला सलामी देण्यासाठी मैदानावर एन.सी.सी. संचलन म्हणजे जणू शिस्तबद्ध तथा एकसमान, लयबद्ध आकर्षक नमूनाच सादर केला.

भारत माता की जय..! वंदे मातरम…! आदी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त घोषणांमुळे वातावरण देशभक्तीमय होण्यासह परीसर जोशपूर्ण निनादाने गजबजून गेला होता.., NCC मध्ये वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट कॅडेटनां सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ना.शि.प्र. संस्थेचे ञैमासिक ‘ज्ञानयाञी’ अंकाचे प्रकाशन मान्यवरांकडून करण्यात आले. श्री.प्रविण अहिरे यांनी प्रकाशन सोहळ्याचे संचलन केले उपस्थितांसमोर क्रीडाशिक्षिका श्रीम. सूनिता देवरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ५ वी आणि ६वी च्या विद्यार्थीनींनी देशभक्तिपर गीतांवर नेञदिपक हालचालींसह सुरेख कवायत प्रकारांचे प्रभावी सादरीकरणही केले.* उपस्थितांसह विद्यार्थ्यांसाठी ‘असाक्षर भारत मुक्त ‘ आणि ‘ कॉपी मुक्त अभियान’ ची शपथ दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणातून मा. श्री. संजीवजी धामणे यांनी NCC परेड श्री. राजेश भामरे , तसेच देशाभक्तिपर गीतावरील कवायत व क्रीडा शिक्षकांचे अतिशय उत्तम सादरीकरणाबद्दल कौतुक करून समाधान व्यक्त केले. ना. शि. प्र. मंडळ नाशिक. पतसंस्थेमार्फत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूञसंचलन करत उपस्थितांचे आभार श्रीम. सूनिता देवरे मॅडम ह्यांनी मानले. वाटप करण्यात आले. ।
शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, , पालक, माजी विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.
