
निगडोळ :-येथील रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता. दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ शिक्षक कापडणीस एन.जे.यांनी सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे चेअरमन मा.बबनराव मालसाने यांच्या हस्ते ध्वजपूजन,दीपप्रज्वलन व ध्वजारोहण झाले.तत्पूर्वी सर्व विद्यार्थी व उपस्थितांनी संविधानाची शपथ घेतली.ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत,राज्यगीत व ध्वजगीत विद्यार्थ्यांनी सुमधुर आवाजात गायले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी खाकी पोशाखात सुंदर संचलन केले.शासनाच्या परिपत्रकानुसार असाक्षर गांव मुक्ती शपथ,कुष्ठरोग मुक्त गांव शपथ शाळेतील विद्यार्थी,पालक वर्ग,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील उपस्थित शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी सामूहिकरीत्या घेतली.देशभक्तीपर गीतांच्या सुमधुर चालीवर सर्व विद्यार्थ्यांनी कवायतीचे सादरीकरण केले.याप्रसंगी विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे व सल्लागार समितीचे सदस्य व विद्यालयाच्या विविध समित्यांचे पदाधिकारी,जि.प.प्रा.शाळा कर्मचारी,शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कर्मचारी,ग्रा.पं.निगडोळचे सरपंच उपसरपंच व सदस्य,प्रा.आरोग्य केंद्र कर्मचारी,माजी विद्यार्थी व निगडोळ गावातील विविध सामाजिक,शैक्षणिक,राजकीय सांस्कृतिक,नोकरी,कृषी व व्यापारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.श्री.कापडणीस एन.जे.यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व श्री.बेद्रे एस.व्ही.यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती.गायकवाड पी.व्ही.श्री.देवरे व्ही.ए.श्री.भामरे टी.व्ही.यांनी अनमोल सहकार्य केले.
